Water Bill : राज्यातील शेतकऱ्यांना दहा पट वाढीव दराने पाणीपट्टी भरण्याच्या नोटीसा

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे वाढीव पाणी पट्टीला लागणार ब्रेक
farmers get 10 times water bill water supply department dilip walse patil devendra fadnavis politics
farmers get 10 times water bill water supply department dilip walse patil devendra fadnavis politicsesakal
Updated on

मंचर : “शेतीसाठी कृषी पंपाद्वारे पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांना दहा पट वाढीव दराने पाणीपट्टी भरण्याच्या नोटीसा जलसंपदा विभागाकडून आल्या आहेत. याबाबत सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वाढीव दरवाढ रद्द करण्याबाबत पाठपुरावा केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणीपट्टी प्रश्नाबाबत तत्काळ तपासणी करून कार्यवाही करण्याचे आदेश राज्य जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर यांना दिले आहेत. याप्रमाणे अमलबजावणी झाल्यास संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढीव पाणी पट्टीला ब्रेक लागणार आहे.

मंचर येथे वळसे पाटील यांना गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांचे शिष्ठमंडळ भेटले होते. नागपूर विधी मंडळात मंगळवारी (ता.१९) वळसे पाटील यांनी फडणवीस यांना पत्र देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली होती.

आंबेगाव, जुन्नर, शिरूर व पारनेर तालुक्यात कुकडी प्रकल्पाअंतर्गत घोड, मीना, कुकडी, कालवे या कार्यक्षेत्रात कृषी पंपाद्वारे लाभधारक शेतकरी पाणी वापर करतात. त्यांना पिकानुसार हेक्टरी सरासरी एक हजार ५०० रुपये वार्षिक पाणीपट्टी आकारली जात होती.पण यावर्षी हेक्टरी बारा हजार रुपये वार्षिक पाणीपट्टी आकारली आहे. पाणीपट्टी रक्कम पाहून शेतकरी वर्गात खळबळ उडाली.

“पाणी पट्टीच्या दरांमध्ये झालेली वाढ फारच जास्त असल्याने वाढीव दराने पाणीपट्टी भरणे शेतक-यांना अडचणीचे आहे. शेतक-यांचे आर्थिक गणित बिघडेल. शेतकरी वाढीव पाणीपट्टी भरण्यास अनुत्सुक आहेत. यामुळे शेतक-यांच्या रोषात वाढ होईल.याबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल. असा मला विश्वास आहे.”

- दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री

“कुकडी प्रकल्पाअंतर्गत ७० बंधारे व तीन नद्या आहेत. तीस हजार शेतकरी पाण्याचा वापर करतात. शेतकऱ्यांनी कृषी पंपाना पाणीमापक यंत्र (मीटर) बसविल्यास त्याप्रमाणात पाणीपट्टी रक्कम आकारणे सोयीचे होईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पाणीमापक यंत्र बसवून सहकार्य करावे.”

प्रशांत कडूसकर, कार्यकारी अभियंता कुकडी पाटबंधारे विभाग नारायणगाव क्रमांक १.

“कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१ च्या कार्यक्षेत्रात बारा हजार १२९ क्षेत्रावर उपसा परवाने देण्यात आले आहेत. जवळपास दहा हजार खाजगी उपसा परवाना धारक आहेत. खाजगी उपसा सिंचन धारकांची संख्या जास्त असल्याने सर्वांनीच पुढील एक ते दोन वर्षात जलमापक यंत्रे उपलब्ध करणे व बसविणे अडचणीचे आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांना थोडा कालावधी वाढवून द्यावा.”

- गोविंद खिलारी,प्रगत शेतकरी भराडी (ता.आंबेगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.