अजून किती दिवस तोट्यातच शेती करायची?

वरकुटे परिसरात कृषी धोरणांबाबत नाराजी; तरकारीला भाव नसल्याने शेतकरी हतबल
farmer
farmersakal
Updated on

निमगाव केतकी : ‘‘बाजारात मालाची आवक वाढली की दर पडतात. अशा बिकटप्रसंगी सरकारने निर्यातीला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. पीक कसे पिकवायचे हे आम्हाला कळते. पण दर पडल्यावर हमीभाव, निर्यात याबाबत सरकारला कसे कळत नाही. अजून किती दिवस तोट्यातच शेती करायची? कृषी धोरण चांगले असते तर आमच्यावर भीक मागण्याची वेळ येणार नाही,’’ अशी संतप्त प्रतिक्रिया जिल्ह्यातील तरकारी उत्पादक शेतकऱ्यांमधून उमटत आहेत.

दोन महिन्यांपासून तरकारी मालाला योग्य बाजारभाव नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. कोरोनाच्या काळात खत, औषधे, बियाणे यासह सर्वच वस्तूंच्या किमती भरमसाट वाढल्या. त्याप्रमाणात शेतीमाल फुकट कसा विकला जात आहे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मार्केटला गेलेला वेलवर्गीय शेतमाल परत आल्याने तो जनावरांना खायला घालायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. बाजारभाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

farmer
संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी पुण्यात दिले नव्या वादंगाला आमंत्रण !

खर्च लाखात अन् उत्पन्न हजारात

निमगाव केतकी येथील रजू भोंग म्हणाले, ‘‘दोन महिन्यात बहुतांश शेतकऱ्यांना टोमॕटो, ढोबळी मिरची, दोडका, कारले, कोबीसह अन्य मालाच्या उलट्या पट्ट्या आल्या आहेत. मिळालेल्या उत्पन्नातून वाहतूक खर्चही निघत नाही. प्रत्येक वेलवर्गीय पिकाला स्टेजिंग, मल्चिंग पेपर, बांधणी यासह अन्य खर्च एकरी लाखात जात असेल अन् पिकाचे दहा हजार सुध्दा होत नसतील तर शेतकऱ्यांनी कोठून पैसा आणायचा. शेती कशी पिकवायची. पाऊण एकर कारल्याला ८० हजार रुपये खर्च केला अन् कारल फक्त वीस पैसे किलोने विकले जात आहे.

farmer
अंगात येणाऱ्या सासूच्या सांगण्यावरून पतीकडून पत्नीचा छळ

दोन महिने झाले शेतकऱ्यांचा सर्वच माल फुकट विकला जात असल्याने शेतकरी आपला माल फेकून देऊ लागले आहेत.निर्यात बंद असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.सरकारने निर्यातीला प्रोत्साहन दिले तरच शेतकऱ्यांला चार पैसे राहतील.आपण अर्ध्या एकरात ढोबळी मिरची केली.तीस हजार खर्च केला.यात झाले दोन हजार.आता फुकट विकली जाऊ लागल्याने ढोबळी मिरची उपटून जनावरांना चारत आहे.

-प्रवीण दत्तू ठवरे, वरकुटे खुर्द

तरकारी घेऊन जाणाऱ्या गाड्या माल भरतानाच वजन करून भरतात तरी सुद्धा मार्केटला तोलाई खर्च घेतात. त्याच गाडीत ड्रायवरकडे मालाच्या पट्ट्या येतात तरी सुद्धा आमच्या कडूनच टपाल खर्च वसुल केला जातो. सध्या एवढी बेकारी शेतकऱ्यांची कधीच झाली नव्हती.शेतकरी जगला तर सगळी जगणार आहेत.

-तुकाराम भोंग, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.