मंचर - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ कर्ज माफी मध्ये पात्र असूनही करंजगाव (ता. नेवासा) येथील २१२ शेतकरी कर्ज माफीच्या लाभापासून वंचित राहिले आहे. कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मंचर (ता. आंबेगाव) येथे राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानाजवळ गुरुवारी (ता. १५) संध्याकाळपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.