कोणाला ऊस द्यायचा, याचा निर्णय शेतकऱ्यांनी घ्यावा

एफआरपी थकीत ठेवणारे २७ साखर कारखाने रेड झोनमध्ये, बड्या नेत्यांच्या कारखान्यांचा समावेश
FRP
FRPsakal
Updated on

पुणे : राज्यात यंदाचा गाळप हंगाम सुरू होण्यास केवळ १८ दिवस उरले आहेत. परंतु गतवर्षीच्या हंगामात ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना काही साखर कारखान्यांनी रास्त व किफायतशीर ऊसदराची (एफआरपी) संपूर्ण रक्कम अद्याप दिलेली नाही. अशा कारखान्यांकडील थकीत रकमेची वसुली करण्याबाबत (आरआरसी) साखर आयुक्तांकडून कारवाई करण्यात आली आहे. तसेच, कोणत्या कारखान्यांना यावर्षी ऊस द्यायचा, याचा योग्य निर्णय शेतकऱ्यांनी घेता यावा, यासाठी साखर आयुक्तालयाकडून रेड झोनमधील कारखान्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

FRP
ॲमेझॉन म्हणजे दुसरी ईस्ट इंडिया कंपनीच; RSSच्या 'पांचजन्य'चा निशाणा

गतवर्षीच्या गाळप हंगामात काही कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीची संपूर्ण रक्कम वेळेत दिली. तर, काही कारखान्यांनी कालावधी उलटूनही एफआरपीची रक्कम दिलेली नाही. शेतकऱ्यांना जास्त रकमेचे आमिष दाखविणे, ऊस गाळपास नकार, हंगामाच्या सुरवातीला शेतकऱ्यांना रक्कम अदा करून शेवटच्या महिन्यात रक्कम थकीत ठेवणे अशा स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे अशा कारखान्यांविरुद्ध साखर आयुक्तालयाकडून आरआरसी आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक १३, सांगली, सातारा, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील प्रत्येकी दोन, नाशिक, नंदुरबार आणि औरंगाबाद जिल्ह्यात प्रत्येकी एक आणि लातूर जिल्ह्यातील तीन कारखाने आहेत. त्यात बड्या राजकीय नेत्यांच्या कारखान्यांचा समावेश आहे.

FRP
सांगली : मंदिर उघडणार, नारळ फुटणार!

एफआरपी थकविणारे सर्वाधिक कारखाने सोलापूरमधील

एफआरपी थकविणाऱ्या २७ साखर कारखान्यांपैकी सर्वाधिक १३ कारखाने सोलापूर जिल्ह्यातील आहेत. त्यामध्ये संत दामाजी सहकारी साखर कारखाना मंगळवेढा, विठ्ठल सहकारी साखर कारखाना पंढरपूर, मकाई सहकारी साखर कारखाना भिलारवाडी, लोकमंगल अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज उत्तर सोलापूर, लोकमंगल शुगर इथेनॉल दक्षिण सोलापूर, सिद्धनाथ शुगर मिल्स उत्तर सोलापूर, गोकूळ शुगर दक्षिण सोलापूर, मातोश्री लक्ष्मी को-जेन अक्कलकोट, जयहिंद शुगर आचेगाव, विठ्ठल रिफाइंड शुगर्स करमाळा, गोकूळ माऊली शुगर्स अक्कलकोट, भीमा सहकारी साखर कारखाना मोहोळ, सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखाना पंढरपूर या कारखान्यांचा समावेश आहे.

FRP
चक्क महापालिकेच्या शाळेतच सुरु होता जुगार अड्डा । Aurangabad

एफआरपी थकीत उर्वरित कारखाने

सांगली : यशवंत शुगर ॲण्ड पॉवर खानापूर, एस.जी. झेड ॲण्ड एसजीए शुगर्स तासगाव. सातारा : किसनवीर सातारा भुईंज, खंडाळा तालुका शेतकरी कारखाना. उस्मानाबाद : लोकमंगल, माऊली लोहारा, कंचेश्वर शुगर तुळजापूर. नाशिक : एस.जे. शुगर मालेगाव. नंदुरबार : श्री सातपुडातापी शहादा. औरंगाबाद : शरद सहकारी साखर कारखाना पैठण. बीड : जयभवानी साखर कारखाना गेवराई. वैद्यनाथ साखर कारखाना परळी वैजनाथ. लातूर : सिद्धी शुगर अहमदपूर, श्री साईबाबा शुगर्स औसा, पन्नगेश्वर शुगर रेणापूर.

"शेतकऱ्यांना नियमित एफआरपी देणारा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम कारखाना कोणता हे ऊस पुरवठादार शेतकऱ्याला समजणे आवश्यक आहे. त्यानुसार नियमित एफआरपी देणारे, हंगाम संपूनही मुदतीत एफआरपी न देणाऱ्या आणि आरआरसी आदेश जारी केलेल्या कारखान्यांची माहिती आयुक्त कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे."- शेखर गायकवाड, साखर आयुक्त.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.