प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी उरला एकच आठवडा: शेतकऱ्यांची लगबग सुरु

Farmers started paying their premiums on time before deadline of pradhan mantri crop insurance
Farmers started paying their premiums on time before deadline of pradhan mantri crop insurance
Updated on

पीक विमा योजनेत सहभागासाठी एकच आठवडा उरल्याने शेतकऱ्यांची लगबग सुरु. 

कोरेगाव भीमा : राज्यात खरीप हंगामापासून तीन वर्षाकरीता राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठीची अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत असून एकच आठवडा उरल्याने अंतिम दिनांकाची वाट न पाहता वेळेत पिक विमा हप्ता भरण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. 

नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पीकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.यामध्ये पिकांच्या नुकसानीच्या कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतकऱ्यांना नाविण्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, कृषि क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरून उत्पादनातील जोखमीपासून शेतकऱ्यांना संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा पीकांचे विविधीकरण आणि कृषि क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ, आदी हेतू साध्य होण्यास मदत, ही योजनेची उद्दीष्ट्ये आहेत. ही योजना अधीसूचीत केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पीकांसाठीच असून कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पीकांसाठी खातेदाराचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडे पट्टीने शेती करणारे शेतकरीही या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेंतर्गत सर्व पिकांसाठी ७० टक्के जोखीम स्तर निश्चित करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार असून शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी २.० टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे.

ताबारेषेवर चीनचे ४० हजार सैनिक; अत्याधुनिक शस्त्रे तैनात

 या योजनेंतर्गत हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पीकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पीकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणी पर्यंत कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर , क्षेत्र जलमय होणे, भूसख्खलन, दुष्काळ पावसातील खंड, किड व रोग यामुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्ती मुळे होणारे पीकांचे नुकसान, नैसर्गिक कारणांमुळे पीकांचे होणारे काढणी पश्चात नुकसान आदी कारणांमुळे होणाऱ्या पीकांच्या नुकसानीस विमा संरक्षण मिळणार आहे.

अरे देवा! पुणे महापालिकेचा आरोग्य विभागच पडला आजारी

नागरी सुविधा केंद्र, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत बँक, विविध कार्यकारी सोसायट्या, कृषि खात्याचे अधिकारी यांच्याकडे या योजनेची अधिक माहिती शकणार आहे. तसेच या योजनेत सहभागासाठी आठ अ व सात बारा उतारा, आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, ७/१२ वर पिकाची नोंद किंवा शेतकऱ्याचा पिकपेरा प्रमाणपत्र या कागपत्रांसह जवळच्या ई सुविधा केंद्रात जाऊन विमा उतरवणे शक्य आहे.

स्वतःला सावरत, धीर देत त्यांनी केली आत्मविश्‍सासाने कोरोनावर मात
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.