Velhe News : करंजावणेत शेतकर्‍याच्या दोन म्हशींचा विद्युत शॉक लागून मृत्यू

शेतकऱ्याचे दोन लाखापेक्षा अधिक नुकसान
Welhe News
Welhe NewsEsakal
Updated on

वेल्हे : करंजावणे (ता.राजगड)येथील राजू मनोहर शिंदे या शेतकर्‍याच्या दोन म्हशींना विद्युत शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना रविवार (ता.०९)रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.सुदैवाने शेतकर्‍याचे प्राण वाचले.मात्र दोन दुभत्या म्हशी गेल्याने शेतकर्‍याचे दोन लाखापेक्षा अधिक नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

Welhe News
Nashik ZP News : मॉन्सूनपूर्व पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची तपासणी करा

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे करंजावणे हद्दीतील गुंजवणी नदी शेजारून मार्गासनी कडे जाणार्‍या कृषी पंपच्या विद्युत लाइनवर झाड पडल्याने पोल वाकून यामधील एक तार तुटल्याने विद्युत प्रवाह पोलवर खाली व परिसरात पसरला होता. आज सायंकाळी शेतकरी राजू शिंदे हे जनावरांना पाणी पाजल्यानंतर घराकडे घेऊन जात असताना दोन म्हशी या खांबाच्या जवळ गेल्याने त्यांना विद्युत शॉक बसला व त्या ठिकाणी त्या तडफडून दगावल्या. दरम्यान मागे राहिलेल्या दोन म्हशी घेऊन शिंदे यांना या म्हशी पडलेल्या दिसल्याने ते जवळ जात असताना त्यांना विद्युत शॉक बसल्याने ते बाजूला झाले व ते इतर दोन जनावरे सुदैवाने बचावले.

Welhe News
Nashik News : निफाड रेल्वे उड्डाणपुलाचा निवडणुकीत विसर; लोकप्रतिनिधी मात्र गप्प

दरम्यान घटनेची माहिती मिळताच महावितरणचे वायरमन मंगेश सुतार; तनवीर शेख, बाळू दीक्षित, उदय तळेकर यांनी तात्काळ परिसरातील विद्युत पुरवठा बंद केल्याने मोठा अनर्थ टळला. घटनास्थळी महावितरण चे शाखा अभियंता विठ्ठल भरेकर यांनी भेट8 देऊन परिस्थितीची पाहणी करत पंचनामा केला यावेळी याप्रसंगी करंजावणे गावचे उपसरपंच आनंद शिंदे, सुरेश शिंदे, प्रशांत शिंदे, विशाल शिंदे, आदी शेतकरी उपस्थित होते. महावितरण ची शाखा अभियंता विठ्ठल भरेकर म्हणाले, आजची घटना दुर्दैवी असून यासंदर्भात पंचनामा केला असून तात्काळ मदतीसाठी प्रस्ताव पाठवला जाईल.

महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नवनाथ घाटुळे म्हणाले, गेल्या काही दिवसापासून राजगड तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे तसेच मान्सूनचे सुद्धा आगमन झाल्याने अनेक ठिकाणी विद्युत पोल वाकले असून तारा तुटल्याच्या घटना घडत आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी स्वतःसह त्यांच्या जनावराची काळजी घेणे गरजेचे आहे. वाकलेले पोल व तुटलेल्या तारा या संदर्भात नागरिकांना निदर्शनास आल्यास त्यांनी महावितरण कार्यालयाशी तात्काळ संपर्क करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.