शिरूरमध्ये वडिल व मुलाचा विजेचा शाॅक बसून मृत्यू 

dead_body
dead_body
Updated on

मांडवगण फराटा (पुणे) : शिरूर तालुक्यातील बाभूळसर बुद्रुक येथे सोमवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास एक शेतकरी व त्यांच्या मुलाचा विजेचा धक्का बसल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

शेतकरी दत्तात्रेय दगडू नागवडे (वय 50) व त्यांचा मुलगा प्रसाद दत्तात्रेय नागवडे (वय 16) हे घरातील खंडीत झालेला वीज प्रवाह सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी इलेक्ट्रिक खांबावरून आलेल्या वायरला हाताचा स्पर्श होताच त्यांना जबरदस्त शॉक बसला. ते पाहून त्यांचा मुलगा वाचविण्यासाठी पुढे गेला, तर तोही वायरला चिकटला. त्यावेळी घरासमोर एकच आरडाओरडा झाल्याचे एेकून संतोष नारायण नागवडे (वय ४३) हे धावत तेथे गेले. त्यांना हे दोघेही वायरचा शॉक बसून सुटण्यासाठी धडपड करीत होते. 

दत्तात्रेय यांच्या पत्नी अश्विनी या काठीने वायर बाजूला काढण्याचा प्रयत्न करीत होत्या. परंतु, त्यांना दोघांनाही वाचवता आले नाही. शेजारी राहणारे संतोष नारायण नागवडे यांनी मीटरमधील फ्यूज काढू्न इलेक्ट्रिक प्रवाह बंद करून दोघांना बाजूला केले. तोपर्यंत दोघेही बेशुद्ध पडले होते. त्यांना ताबडतोब वाहनातून मांडवगण फराटा येथील वरदविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी दत्तात्रेय दगडू नागवडे यांना मृत घोषित केले, तर मुलगा प्रसाद याला प्राथमिक उपचार करून पुढील अत्यावश्यक उपचारासाठी दौंड येथे पाठवले. मात्र, तेथे उपचारादरम्यान पहाटे प्रसाद याचाही मृत्यु झाला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या प्रकारामुळे नागवडे कुटुंब व संपूर्ण बाभूळसर गावावर शोककळा पसरली. दोघांवरही दुःखमय वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. य़ाबाबतचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रवीण खानापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आबासाहेब जगदाळे, सुभाष रुपनवर, कॉन्स्टेबल योगेश गुंड, किरण डुके, अक्षय काळे हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.