Daund Crime : घराबाहेर काढल्याने बेरोजगार तरूणाकडून वडिलांचा खून

पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घराबाहेर काढल्याच्या कारणावरून एका बेरोजगार तरूणाने रागाच्या भरात वडिलांचा खून केला आहे. शहरातील साठेनगर भागात ही घटना घडली.
Daund Police Station
Daund Police Stationsakal
Updated on

दौंड - पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घराबाहेर काढल्याच्या कारणावरून एका बेरोजगार तरूणाने रागाच्या भरात वडिलांचा खून केला आहे. शहरातील साठेनगर भागात ही घटना घडली.

दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक गोपाळ पवार यांनी या बाबत माहिती दिली. सुनील लक्ष्मण रणदिवे (वय-५७, रा. साठेनगर, दौंड) असे मृत वडिलांचे नाव आहे. सुनील रणदिवे यांचा मुलगा सचिन सुनील रणदिवे (वय-३५) हा विवाहित असून कौटुंबिक वादातून त्याची पत्नी सोलापूर येथे माहेरी निघून गेली होती.

तिला परत आणण्यासाठी सचिन गेला असता तिने येण्यास नकार दिल्याने तो ६ ऑक्टोबर रोजी दौंड येथे परतला. त्या रागाच्या भरात सचिन याने आईवडिलांशी वाद घातला. त्याला समजावण्याचा प्रयत्न करूनदेखील तो ऐकत नसल्याने दुपारी दोन वाजता सुनील रणदिवे यांनी त्याला घराबाहेर काढून घराला कुलूप लावले.

रविवारी रात्री सचिन हा घरी परतला व रागाच्या भरात त्याने घरासमोर झोपलेल्या वडिलांच्या डोक्यात त्याने काँक्रीट पेव्हर ब्लॉक मारला. गंभीररित्या जखमी झालेल्या सुनील रणदिवे यांच्यावर दौंड उप जिल्हा रूग्णालयात प्रथमोपचार करून पुणे येथील ससून सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु ७ ऑक्टोबर रोजी उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

दौंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी सुनील रणदिवे यांची पत्नी जयश्री सुनील रणदिवे यांच्या फिर्यादीनुसार सचिन याच्याविरूध्द खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन याला अटक करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()