Pune : पोटचा गोळा गेला, आमच्या जगण्याचा आधारच हरपला ; पुणे महापालिकेच्या आंबेडकर वसतिगृहात मृत्यू झालेल्या मुलाच्या वडिलांचा टाहो

‘‘पप्पा, मुसळधार पावसातही ठाण्याच्या पोलिस मैदान चाचणीत माझी कामगिरी चांगली झाली, मला चांगले मार्कदेखील मिळाले. आता मी लवकरच पोलिस होणार,’’ असं शेवटचं बोलणं झाल्यानंतर दोन दिवसांतच वसतिगृहातील अस्वच्छतेने वेदांत सुभाष सोनुने (वय २१) या उमद्या तरुणाचा बळी गेला.
Pune
Pune sakal
Updated on

शिवाजीनगर : ‘‘पप्पा, मुसळधार पावसातही ठाण्याच्या पोलिस मैदान चाचणीत माझी कामगिरी चांगली झाली, मला चांगले मार्कदेखील मिळाले. आता मी लवकरच पोलिस होणार,’’ असं शेवटचं बोलणं झाल्यानंतर दोन दिवसांतच वसतिगृहातील अस्वच्छतेने वेदांत सुभाष सोनुने (वय २१) या उमद्या तरुणाचा बळी गेला.

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्याच्या शेलूद या गावात ग्रामपंचायतीमध्ये रोजगार सेवक म्हणून काम करणारे सुभाष सोनुने यांचा वेदांत हा मुलगा पुण्यातील घोले रस्ता येथील पुणे महापालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहात राहत होता. तो शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयातील कला शाखेत द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. त्याचबरोबर एमपीएससी व पोलिस भरतीची परीक्षाही देत होता. मात्र, डेंगी झाल्याने त्याचा २ ॲागस्टला उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने सोनुने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

वेदांतचे वडील सुभाष सोनुने यांच्याशी संवाद साधत असताना त्यांचा कंठ दाटून आला. ते म्हणाले, ‘‘वेदांत जास्त आजारी असल्याचे आम्हाला त्याच्या मित्राने सांगितले. आम्ही गावाकडून निघालो, दुसऱ्या दिवशी पुण्यात पोहोचलो. त्याला पूना रुग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवले होते. त्याला जागे करण्यासाठी ‘बाळा ऊठ, पप्पा आलेत, आई आली’, अशी विनवणी केली; मात्र, तो उठला नाही. डॉक्टरांनी २ ॲागस्टला रात्री १२ वाजता त्याला मृत घोषित केले. खासगी रुग्णवाहिकेला १५ हजार रुपये देऊन त्याचा मृतदेह गावाकडे घेऊन गेलो व तिथे अंत्यसंस्कार केले. माझ्या पोटचा गोळा गेला, माझ्या वाट्याला जे दु:ख आलं, ते इतर कोणाच्याही वाट्याला येऊ नये. आम्हाला जमीन नाही, वेदांत गेल्यामुळे आम्ही उघड्यावर आलो आहोत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.