रेमडेसिव्हिरवर निर्बंध;ऑक्‍सिजनवरील रुग्णांनाच इंजेक्‍शन देण्याच्या "एफडीए'च्या सूचना 

रेमडेसिव्हिरवर निर्बंध;ऑक्‍सिजनवरील रुग्णांनाच इंजेक्‍शन देण्याच्या "एफडीए'च्या सूचना 
Updated on

पुणे -  रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन आता फक्त ऑक्‍सिजनवर (मॉडिरिट कंडिशन) असलेल्या रुग्णास देण्याच्या स्पष्ट सूचना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गुरुवारी दिल्या. 
कोरोनाबाधितांवर उपचारांसाठी रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा वापर चार पटींना वाढला आहे. पुण्यातील रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांच्या नातेवाइकांनाही धावपळ करावी लागत आहे. या इंजेक्‍शनच्या खरेदीसाठी परगावाहून रुग्णाचे नातेवाईक पुण्याकडे धाव घेत असल्याचे भीषण वास्तव "सकाळ'ने मांडले. त्याची दखल घेत "एफडीए'ने या सूचना दिल्या. त्याची प्रत इंडियन मेडिकल असोसिएशनलाही देण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

"एफडीए'च्या पुणे विभागाचे सहआयुक्त एस. बी. पाटील म्हणाले, ""रेमडेसिव्हिर हे इंजेक्‍शन ठराविक औषधनिर्माण कंपन्यांमधूनच तयार होत आहे. याचे उत्पादन आणि मागणी यात मोठी तफावत आहे. त्यामुळे बाजारात या औषधांचा तुटवडा झाला असून, गरजू रुग्णांना वेळेत ही औषधे मिळत नाहीत. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. त्या आधारावर ही रेमडेसिव्हिर व टॉसिलिझुमॅब इंजेक्‍शनच्या वापरबद्दल सूचना दिल्या आहेत.'' 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठीच डॉक्‍टर या इंजेक्‍शनचा वापर करतात. रेमडेसिव्हिरचा पुरवठा योग्य पद्धतीने केला जात नाही. इंजेक्‍शनच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न करण्याऐवजी डॉक्‍टर याचा जास्त वापर करतात, हे सांगितले जाते, ते पूर्णत- चुकीचे आहे. पुरवठा योग्य पद्धतीने केल्यास त्याचा गैरवापर आणि काळा बाजार होणार नाही. 
- डॉ. अविनाश भोंडवे, प्रदेशाध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

"एफडीए'ने दिलेल्या सूचना 
- हॉस्पिटलमधील रुग्णसंख्या विचारात घेऊन, इंजेक्‍शनचा मर्यादित साठा करावा 
- इंजेक्‍शन वापराबाबत नोंदवही तयार करावी 
- पेशंटचे नाव व पत्ता, औषधाचे नाव, समूह क्रमांक, वापरलेली संख्या व आकारलेली किंमत याचा तपशील नोंदवहीत करावा 
- काही कारणांनी इंजेक्‍शनचा पूर्ण डोस न झाल्यास उर्वरित साठा हॉस्पिटल फार्मसी किंवा रुग्णांच्या नातेवाईकास परत करून त्याची नोंद ठेवावी. 
- कोवीड वॉर्डात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवावे 
- हॉस्पिटलमध्ये गैरप्रकार होणार नाही, याची दक्षता घ्यावी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.