Sassoon hospital: ससून हॉस्पिटल प्रकरणात आणखी एक ट्वीस्ट; चौकशीच्या भीतीने एक कर्मचारी पळाला

Sassoon hospital Doctor Blood Report case: ससून हॉस्पिटलमधील रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी पळून गेल्याचं समोर आलं आहे.
Sassoon hospital
Sassoon hospital
Updated on

पुणे- ससून हॉस्पिटलमधील रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी पळून गेल्याचं समोर आलं आहे. चौकशीच्या भीतीने हा कर्मचारी पळाला असल्याची माहिती आहे. पोलिसांची एक टीम या कर्मचाऱ्याच्या मागावर आहे. पोलीस ताब्यात घेतील या भीतीने हा कर्मचारी पळाल्याचं कळतंय. ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी आतापर्यंत तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी आणखी काही कारवाई होण्याची शक्यता आहे.

ससूनमधील गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती आज ससून हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे. चौकशी आधीच एक कर्मचारी पळाला आहे. रक्त चाचणी विभागातील कर्मचाऱ्यांची आज चौकशी होणार आहे. जे जे कर्मचारी उपस्थित होते त्यांचा जबाब घेतला जाणार आहे. तसेच या गैरव्यवहारात आणखी कोणाचा हात आहे का? याबाबत तपास केला जाणार आहे.

Sassoon hospital
Pune Porsche Accident : मोटारीबाबत आरटीओची भूमिका संशयास्पद; अधिकाऱ्याची ‘सरकारी’ उत्तरे; माहिती दडविण्यासाठी उठाठेव

ससून हॉस्पिटलमध्ये गैरप्रकार झाल्याचं समोर आलं आहे. कल्याणीनगर अपघाताप्रकरणात आरोपीचे ब्लड सॅम्पल कचऱ्यात टाकल्याचा आरोप डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हरनोर यांच्यावर आहे. त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तीन लाख रुपये घेऊन हरनोर याने रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. यात आणखी कोणाचा हात आहे का? याचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे.

जेजे हॉस्पिटलच्या डीन डॉ. पल्लवी सापळे या समितीच्या अध्यक्षा आहेत. त्यांच्या नेतृत्त्वातील टीम आज ससून हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे. याप्रकरणात रक्त चाचणी विभागातील कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर यासंदर्भातील रिपोर्ट राज्य सरकारला सादर केला जाईल. यातून काय समोर येतं हे पाहावं लागणार आहे.

Sassoon hospital
Pune Porsche Accident : मोटारीबाबत आरटीओची भूमिका संशयास्पद; अधिकाऱ्याची ‘सरकारी’ उत्तरे; माहिती दडविण्यासाठी उठाठेव

कल्याणीनगरमध्ये एका अल्पवयीन तरुणाने आपल्या आलिशान कारने टू-व्हीलरला उडवले होते. यात तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला होता. आरोपी तरुण हा बिल्डर विशाल अग्रवाल याचा मुलगा आहे. पैशाच्या जोरावर याप्रकरणी दबाव निर्माण करण्यात आल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात येरवडा पोलीस स्टेशनमधील दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. सध्या हे प्रकरण गाजत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.