Breaking : आता पुणे जिल्हा परिषदेतही कोरोनाने केली एन्ट्री; वाचा सविस्तर! 

ZP-Pune
ZP-Pune
Updated on

पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे मुख्यालय शहराच्या मध्यभागात असूनही मागील साडेतीन महिने कोरोनाला रोखून धरण्यात जिल्हा परिषद प्रशासनाला यश आले होते. मात्र, अखेर जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात शिरकाव करण्यात कोरोना विषाणू यशस्वी ठरला आहे. मुख्यालयातील एका महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामुळे या महिलेच्या शेजारी बसणाऱ्या अन्य दोन कर्मचाऱ्यांना गृह विलिनीकरण (होम क्वॉरंटाइन) करण्यात आले आहे.

या घटनेने पुणे जिल्हा परिषद मुख्यालयात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या महिलेच्या संपर्कात आलेल्या जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांची धाकधूक वाढली आहे.

कोरोनाग्रस्त महिला काम करत असलेला विभाग हा जिल्हा परिषदेचा कणा मानला जातो. त्यामुळे प्रत्येक विभागाचा या विभागाशी सातत्याने  संपर्क येतच असतो. कारण या विभागाच्या मदतीशिवाय अन्य विभागातील कामाचे पानही हलू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

या महिला कर्मचाऱ्याच्या सासू या कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यामुळे त्यांना सासूच्या संपर्कात आल्याने कोरोना संसर्ग झाल्याचा प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाच्यावतीने वर्तविण्यात आला आहे. 

कोरोनाबाधित महिला कर्मचारी आजारी असल्याने मागील आठ दिवसांपासून जिल्हा परिषद मुख्यालयात आलेल्या नसल्याचे संबंधित विभागातून सांगण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषद मुख्यालयातील पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.