तुमच्या हातात लग्नाची की पोलिसांची बेडी? ‘पन्नास’ची मर्यादा पाळावीच लागणार

The fifty limit has to be observed  for Marriage by pune police
The fifty limit has to be observed for Marriage by pune police
Updated on

पुणे : वैयक्तिक सहजीवनाची गाठ बांधण्याआधी म्हणजे, लग्नाच्या बेडीत अडकताना तुम्हाला शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींची काळजी घ्यावी लागेल. नाही तर; वधू-वर पित्यांसह मंगल कार्यालय, लॉन्स मालकांना पोलिसांच्या बेडीत अडकण्याशिवाय पर्याय उरणार नाही. म्हणजे, मंगलाष्टकाप्रमाणे ‘शुभमंगल सावधान’ सारखेच गर्दी करतानाही सावधान राहावे लागणार आहे. लग्नांसोबत सारखपुडा, डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमांपासून साऱ्याच घरगुती आणि विशेषतः सार्वजनिक कार्यक्रमांवर महापालिका, जिल्हा प्रशासन आणि पोलिसांची नजर राहणार आहे. अशा ठिकाणी ५० लोकांपेक्षा अधिकजण एकत्र आले आणि गर्दी झाली तर, हमखास कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. कुठच्या कार्यक्रमांत नेमकी किती गर्दी होते आहे, याची वाट न पाहता महापालिका अधिकारी आणि पोलिस मुहूर्ताआधीच कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचणार आहेत. त्याआधी खबरदारी म्हणून गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्याची तंबी मंगल कार्यालये, लॉन्स, हॉटेल मालकांना देण्यात आली आहे. तेव्हा, आता वधू-वर, त्यांचे पिते आणि वऱ्हाडी मंडळींनाही खूपच काळजी घ्यावी लागेल.



अशी आहे स्थिती
- कोरोनाची साथ वाढत असतानाही लग्न आणि अन्य कार्यक्रमांना गर्दी होते
- कार्यक्रमांना दोनशे जणांची मर्यादा असतानाही किमान एक-दीड हजार लोक उपस्थितीत राहिल्याच्या तक्रारी
- अशा कार्यक्रमांतून संसर्ग वाढू नये, म्हणून कठोर पावले
- सर्वच कार्यक्रम ५० लोकांत आटोपण्याचा आदेश
- आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या पोलिसांना सूचना
- लग्न, अन्य कार्यक्रमाआधी दोन-चार दिवस पोलिस महापालिकेचे अधिकारी लक्ष ठेवणार
- तरीही, नियम डावलून कार्यक्रम केल्यास संबंधितांवर साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई

हेही वाचा - कोरोना लसीमुळे रक्तात गुठळ्या; जगभरात भीती आणि गोंधळ

हेही वाचा - NEET 2021 : मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तारखा जाहीर

कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाही सार्वजनिक ठिकाणच्या कार्यक्रमांना गर्दी होत आहे. प्रामुख्याने लग्न आणि इतर कार्यक्रमांत राजकीय नेते, त्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी होत आहे. मात्र, खबरदारीच्या दृष्टीने काळजी घेतली जात नाही. त्यामुळे कोरोनाची साथ वाढताना दिसत आहे.
- डॉ. संजीव वावरे, प्रमुख, साथरोग नियंत्रण अधिकारी, महापालिका

शहरात खासगी आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी लोकांची गर्दी होऊन नियमांचे उल्लंघन होणार नाही, यासाठी मंगल कार्यालये, लॉन्स व्यवस्थापनाला सूचना केल्या आहेत. ज्या दिवशी कार्यक्रमांचे ‘बुकिंग’ आहे, त्यादिवशी सर्व यंत्रणाकडून देखरेख करण्यात येणार आहे. कोरोना रोखण्याच्या उपाय न पाळल्यास कठोर कारवाई होईल.
- संदीप कदम, सहायक आयुक्त, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.