पत्नीला तोंडी तलाक देवून घरातून बाहेर काढणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल करा

न्यायालयाचा आदेश, ट्रिपल तलाकचे प्रकरण
File a case against the husband who orally divorced his wife
File a case against the husband who orally divorced his wifesakal
Updated on

पुणे : तू आंधळी व डबल बॅटरी आहे. तुला येथे नांदायचे असेल तर माहेरहून पाच लाख रुपये (Five lakh rupees) घेऊन ये’’, असे म्हणत पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ करणाऱ्या आणि तिला तोंडी तलाक देवून घराबाहेर काढणाऱ्या पतीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने दिला ( order By the court) आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. आर. पाटील यांना हा आदेश दिला.

पति मोहसीन इद्रिस खान ऊर्फ राज, सासू शाकिराबी इद्रिस खान, सासरे इद्रिस खान, नणंद वसिया इद्रिस खान, दिर फिरोज इद्रिस खान, दिर असीम इद्रिस खान, नणंद फौजीया आसिफ शेख, नंदावा आसिफ शेख, मामी सासू सुमय्या सलमान शेख, मामी सासू नसरीन इरफान शेख, आसिफ खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने स्वारगेट पोलिसांना दिला आहे. याबाबत विवाहितेने अॅड. साजिद शाह यांच्यामार्फत न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती.

File a case against the husband who orally divorced his wife
नवीन वर्षात सहावे सेरो सर्वेक्षण; लसीकरण मोहिमेचा परिणाम पालिकेला कळणार

मोहसीन आणि तक्रारदार महिला यांचा २०१६ साली विवाह झाला होता. लग्नानंतर सुरवातीला आरोपींनी फिर्यादींना काही दिवस चांगले वागवले. त्यानंतर शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरवात केली. लग्नात दागिने नाही दिले म्हणून सासरच्यांनी त्यांना लाथाबुक्यानी मारहाण केली. त्यानंतर चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना तोंडी तलाक देत घराबाहेर काढले. तू अंधी है, डबल बॅटरी है’, ‘तेरी यहाँपर नांदणे की औकात नही’ असे बोलून महिलेला मारहाण करून अपमानित करीत, असे महिलेने न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत नमूद आहे.

तक्रारदार महिलेला आरोपी गेल्या काही दिवसांपासून त्रास देत होते. तिला तोंडी तलाक देऊन घराबाहेर काढण्यात आले आहे. तसेच तिच्याकडे वेळोवेळी ५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. याबाबत आम्ही न्यायालयात केलेल्या अर्जाची दखल घेत स्वारगेट पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

-अॅड. साजिद शाह, तक्रारदार महिलेचे वकील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.