खेड महसूलचा मुरूम माफियांना दणका

The file was recovered by Khed revenue pimples For And sand traders
The file was recovered by Khed revenue pimples For And sand traders
Updated on

आंबेठाण(पुणे): शासकीय किंमत न भरता होत असलेले गौण खनिज उत्तखनन रोखण्यासाठी खेड महसूलने मोठे पाऊल उचलले असुन आज (ता.९) केलेल्या कारवाईत जवळपास आठ लक्ष एकवीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मुरूम आणि वाळू व्यवसाय करणाऱ्यांकडून हा दंड वसूल करण्यात आला आहे.आजवर झालेल्या मोठ्या कारवाई पैकी ही एक कारवाई मानली जात आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खेडचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण आणि तहसीलदार सुचित्रा आमले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कारवाईत चाकणचे मंडलाधिकारी राजेंद्र वाघ, चाकणचे तलाठी श्रीधर आचारी, म्हाळुगेचे तलाठी शाम वालेकर, आंबेठाणचे तलाठी खलील शेख आणि वासुलीचे तलाठी दत्तात्रय केंगले यांच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे. यात खालूम्बरे येथे कारवाई करत असताना वाळूचा एक ट्रक घेऊन फरार झाला असून त्याबाबत राजेंद्र वाघ यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चाकण एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात कारखाने उभारण्याची आणि जमीन विकासाची कामे सुरू असल्याने गौण खनिजाला मोठे महत्त्व आले आहे. अनेक जण याचा व्यवसाय करीत असून त्यासाठी शासकीय किंमत( रॉयल्टी) भरली जात नाही. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. आज केलेल्या कारवाईने असा बेकायदेशीर व्यवसाय करणारांचे धाबे दणाणले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()