Pune Corporation : अखेर महापालिकेस जाग, रस्त्यांवरील अतिक्रमणांविरुद्ध महापालिका "ऍक्‍शन मोड'वर

पहिल्याच दिवशी फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर धडक कारवाई
Pune Corporation
Pune Corporationesakal
Updated on

पुणे ः पदपथांवरील अतिक्रमणांमुळे नागरिकांवर जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालण्याची वेळ येऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेला अखेर जाग आली. महापालिका प्रशासनाने रस्त्यांवरील अतिक्रमणांविरुद्ध कारवाईसाठी केलेल्या आराखड्यानुसार सोमवारपासून प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरूवात केली. पहिल्याच दिवशी फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर महापालिका प्रशासनाने धडक कारवाई करत अतिक्रमणे, दुकानांसमोरील फ्रंट मार्जिन, शेड यासह अनधिकृत बांधकामे काढली. विक्रेत्यांकडून होणारा विरोध लक्षात घेऊन महापालिका प्रशासनही मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा घेऊन कारवाई करण्यास रस्त्यावर उतरले.

Pune Corporation
Jalgaon Accident News : कारचे नियंत्रण सुटल्याने झाडावर आदळली; कासमवाडीतील तरुण ठार

शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठा, बाजारपेठ, अंतर्गत रस्त्यांसह प्रमुख रस्ते, उपनगरांमधील रस्त्यांवरील पदपथांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. विशेषतः लोकसभा निवडणुकीच्या काळात अतिक्रमण विभागाचे अधिकारी निवडणुकीच्या कामात गुंतल्याने रस्त्यांवरील अतिक्रमणांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन पदपथाऐवजी रस्त्यांवरून पायी जावे लागते. या प्रश्‍नाकडे "सकाळ'ने लक्ष वेधले होते. दरम्यान, केंद्रीय सहकार व विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नुकतीच महापालिका आयुक्त कार्यालयात आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांची भेट घेतली. त्यावेळी उपस्थित माजी नगरसेवकांनीही रस्त्यांवरील अतिक्रमणांचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर मोहोळ यांनी राजकीय दबावाला बळी न पडता थेट कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.दरम्यान, महापालिका प्रशासनाने शहरातील पाच परिमंडळामध्ये अतिक्रमण कारवाईच्या नियोजनाचा आराखडा तयार केला. शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये ही कारवाई करण्याचे निश्‍चित झाले होते. २८ जुलै पर्यंत शहरातील पाच परिमंडळानुसार अतिक्रमण कारवाई करण्याचे निश्‍चित केले. त्यानुसार, महापालिकेच्या अतिक्रमण विभाग, बांधकाम विभाग, क्षेत्रीय कार्यालय यांच्याकडून संयुक्तपणे कारवाई करण्यास सुरवात झाली.

Pune Corporation
Nashik Crime News : तोडफोड करणाऱ्या सराईताच्या मुसक्या आवळल्या; शहर गुन्हेशाखेच्या गुंडा पथकाकडून अटक!

फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर धडक कारवाई

फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर मागील काही वर्षात पदपथावरील अतिक्रमणांसह हॉटेल्स, रेस्टॉरंटस्‌, विविध प्रकारच्या दुकानांकडून अतिक्रमण करण्यात आली होती. महापालिका प्रशासनाने पहिल्याच दिवशी फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर धडक कारवाईला सुरवात केली. सोमवारी सायंकाळी सहा वाजता मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त घेऊन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथक फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर उतरले. जेसीबी यंत्राच्या साहाय्याने इमारती, दुकाने, हॉटेल्ससमोर केलेले बेकायदेशीर बांधकाम, उभारलेले शेडही यंत्राच्या साहाय्याने काढून टाकण्यात आले. अनधिकृत स्टॉल्स, शेड पाडण्यात आले. याबरोबरच खाद्यपदार्थ स्टॉल्स, चायनीज सेंटर, पान, आइस्क्रीम शॉप, कपड्यांसह विविध प्रकारच्या वस्तु विक्रीचे स्टॉल्सवरही कारवाई करण्यात आली. अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या कारवाईदरम्यान उपस्थित होते. काही विक्रेत्यांनी कारवाईला विरोध दर्शवीत महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्याचाही प्रयत्न केला.

Pune Corporation
शाळाबाह्य,स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष शोधमोहीम

विविध क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतही कारवाई

हडपसर परिसरामध्ये सोलापुर रस्त्यावरील भैरोबा नाला ते रविदर्शन पर्यंतच्या रस्त्यावरील अनधिकृत स्टॉल्स, हातगाड्या, विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी दुकाने, गाळ्यांसमोरील जागेत (फ्रंट मार्जिन) केलेले अनधिकृत बांधकाम, शेडही काढून टाकण्यात आले. अतिक्रमण विभाग, बांधकाम विभाग, हडपसर क्षेत्रीय कार्यालय यांच्या संयुक्त कारवाईत 26 हजार चौरस फूट कच्चे बांधकाम पाडण्यात आले. थकीत परवाना, अनधिकृत व्यावसायिकांवर अतिक्रमण निर्मुलन कारवाई करण्यात आली. याबरोबरच धनकवडी, सहकारनगर, नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतही रस्ते व पदपथांवरील अतिक्रमण कारवाई करण्यात आली.

" महापालिकेच्या पाच उपायुक्त कार्यालयाच्या हद्दीत अतिक्रमण कारवाई करण्यात येणार आहे. दररोज एका क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत अतिक्रमण कारवाई होईल. पुढील १५ दिवसांच्या कारवाईचे नियोजन करण्यात आले आहे.'

- पृथ्वीराज पी.बी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.