Pune News : अतिरिक्त आयुक्तपदाच्या पदोन्नतीच्या बैठकीला अखेर मुहूर्त

पुणे महापालिकेच्या सेवेतील अधिकाऱ्यांची पदोन्नतीने अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती करण्यासाठी अखेर विभागीय पदोन्नती समितीची (डीपीसी) बैठकीचा मुहूर्त निषेध करण्यात आला आहे.
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSakal
Updated on

पुणे - पुणे महापालिकेच्या सेवेतील अधिकाऱ्यांची पदोन्नतीने अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती करण्यासाठी अखेर विभागीय पदोन्नती समितीची (डीपीसी) बैठकीचा मुहूर्त निषेध करण्यात आला आहे ही बैठक २७डिसेंबर रोजी होणार असल्याचे महापालिकेला नगरविकास विभागातर्फे कळविण्यात आलेले आहे. दरम्यान, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही बैठक होणार होती ती अचानक रद्द करण्यात आलेली होती.

डीपीसीने अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्त होण्यासाठी शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल आणि सह आयुक्त उल्का कळसकर हे तिन्ही अधिकारी पात्र असल्याचे निश्चित केले आहे.

यापूर्वी डीपीसीती बैठक ५ डिसेंबर रोजी होणार होती. मात्र, आदल्या दिवशी सायंकाळी अचानक ही बैठक रद्द केली होती. त्यानंतर आता पुन्हा ही बैठक येत्या २७ डिसेंबर रोजी होणार आहे. या समितीची बैठक नगर विकासचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. पुणे महापालिका आणि पिपंरी चिचंवड पालिका आयुक्त व्हीडीओ कॉनफरसिंगदारे उपस्थित राहणार आहेत.

कळस्कर यांचा कार्यकाल सात

महापालिकेतील या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एक जण अतिरिक्त आयुक्त होऊ शकतो. यामध्ये वाघमारे यांचा दोन वर्षाचा कार्यकाल शिल्लक आहे. कंदुल यांची अवघे पाच महिने सेवा शिल्लक आहे. तर कळसकर यांची सेवा आणखीन सात वर्ष शिल्लक आहे. त्यामुळे या निवड समितीच्या बैठकीत नेमकी कोणाला पदोन्नती मिळणार याकडे लक्ष लागलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.