बालेवाडी : बाणेर येथील पारखे मळ्यात काही दिवसांपूर्वी घराला लागलेल्या आगीतून माय-लेकींना सुखरुप बाहेर काढून, आग विझविताना आगीचा भडका होऊन मारुती बनकर हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बिकट परिस्थितीमुळे उपचारासाठी बनकर कुटूंबाने मदतीचे आवाहन करता बाणेर-बालेवाडीकरांनी लाखो रुपये जमा करून माणुसकी अजूनही जिवंत असल्याची जाणीव करून दिली आहे.(financial assistance to bankar family from baner-balewadikar)
बाणेर येथील पारखे मळ्यामध्ये राहणारे,कुरियर घरपोच देण्याचे काम करणारे मारुती बनकर हे काही दिवसांपूर्वी शेजारच्या घरात आग लागली असताना स्वतःचा जीव धोक्यात दोघी मायलेकींनी सुखरूप बाहेर काढले. आग विझवत असताना आगीचा भडका होऊन बनकर हे गंभीररित्या भाजले गेले. त्यामुळे त्यांना पिंपळे गुरव येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारासाठी चार लाखांपर्यंत खर्च येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घरची परिस्थिती बिकट, त्यातच महिन्यापूर्वी सर्व कुटुंब कोरोना बाधित झाल्यामुळे आणि काम बंद होते. अशात ही घटना घडल्यामुळे या कुटुंबावर मोठे संकट कोसळले. एवढे पैसे कसे जमा करायचे? हा प्रश्न सारिका मारुती बनकर यांच्या पुढे उभा राहिला. त्यामुळे सोशल मीडियाद्वारे त्यांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले. सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू आहे, जनजीवन, आर्थिक व्यवहार सगळे ठप्प झाले आहेत.
अशा परिस्थितीतही बाणेर बालेवाडीकर या कुटुंबीयांच्या मदतीला तात्काळ धाऊन आले. या भागातील सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांकडून तब्बल तीन लाखांपर्यंतची आर्थिक मदत जमा झाल्याने माणुसकी अजूनही जिवंत असल्याची जाणीवच करून दिली आहे. या मदतीमुळे बनकर उपचार घेऊन बरे होऊन आता घरी परतले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.