‘अजून किती जीव गेल्यावर अग्निशमन केंद्र उभारणार?’

पिरंगुट येथील औद्योगिक परिसरात अग्निशमन केंद्र नसल्याने येथील कारखान्यांची आणि नागरिकांचीही सुरक्षा रामभरोसे ठरली आहे.
Fire Brigade
Fire BrigadeSakal
Updated on

पिरंगुट - येथील औद्योगिक परिसरात (Industrial Area) अग्निशमन केंद्र (Fire Brigade) नसल्याने येथील कारखान्यांची (Factory) आणि नागरिकांचीही सुरक्षा (Public Security) रामभरोसे ठरली आहे. ‘अजून किती जीव गेल्यावर हे केंद्र उभारणार?’ अशा संतप्त शब्दांत येथील नागरिक आणि कारखानदार विचारणा करीत आहेत. (Fire Brigade Issue in Pirangut Industrial Area)

या परिसरात वारंवार आगीच्या घटना घडतात. ‘सकाळ’ने येथील अग्निशमन केंद्राच्या उभारणीबाबत अनेकदा वृत्त प्रसिद्ध केलेले आहे. उरवडे येथील एसव्हीएस कंपनीतील अग्नीकांड म्हणजे त्यावर कळस ठरला असून, अजून तरी शासनाने त्याची गांभिर्याने दखल घेणे अत्यावश्यक ठरले आहे. गेल्यावर्षी १५ मे २०२० रोजी एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या कंपन्यांत केवळ दीड तासाच्या फरकाने शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या. येथील व्हल्कन कंपनीच्या शेडला लागलेल्या आगीपाठोपाठ लवळे फाटा येथील फ्रॅंकॉईस कॉम्प्रेसर या कंपनीतही शॅार्टसर्किटमुळे आग लागल्याने दोन जनरेटर जळून खाक होऊन सुमारे तीस लाख रुपयांचे नुकसान झाले होते. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनीही या घटनांची चौकशी केली होती. त्यावेळी सुळे म्हणाल्या होत्या, ‘या घटनांमध्ये भविष्यात जीवित व वित्तहानी होऊ नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. पिरंगुटला अग्निशमन दलाचे एक केंद्र असावे, यासाठी पीएमआरडीए आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे माझा पाठपुरावा सुरु आहे. लवकरच तेथे केंद्र सुरु होईल, अशी मला आशा आहे.’ परंतु त्यानंतर पुढे काहीच कार्यवाही झाली नाही.

Fire Brigade
कोरोनापासून मुलांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून पूर्वतयारी

कागदेपत्री दखल

या भागातील एमआयडीसी, नागरिक तसेच विविध संस्थांनी अग्निशमन केंद्राची मागणी वारंवार केलेली आहे. मात्र, शासनाने केवळ कागदोपत्री दखल घेऊन त्याला मंजुरी दिली आहे. ‘सकाळ’नेही वारंवार बातम्यांच्या माध्यमातून हा विषय मांडला आहे. आता तरी या भागात अग्निशमन केंद्र सरकारने तातडीने सुरू करावे, अशी मागणी येथील ग्रामपंचायत व विविध कारखानदारांनी केली आहे.

कार्यवाही होईना

पिरंगुटचे सरपंच चांगदेव पवळे म्हणाले, ‘‘पिरंगुट ग्रामपंचायतीने वर्षभरापासून अग्निशमन केंद्रासाठी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला आहे. त्यासाठी येथील तुळजाभवानी मंदिराची टेकडी, गट क्रमांक ११०६ व गट क्रमांक २७२ मधील गायरान जमीन, लवळे फाटा येथील गट क्रमांक १३९ आदी जागांपैकी एका जागेत अग्निशमन केंद्र उभारावे, अशी मागणी केली आहे. त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.’’ उरवडे येथील माजी उपसरपंच नरेंद्र मारणे यांनीही या परिसरात अग्निशमन केंद्र उभारण्याची मागणी केली आहे.

तीन वर्षांत तीस घटना

गेल्या केवळ तीनच वर्षांचा विचार केल्यास पिरंगुट, भरे, कासार आंबोली, उरवडे आदी परिसरात आग लागण्याच्या सुमारे पंचवीस ते तीस घटना घडलेल्या असून, लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. त्यात घरे, गोठे, दुकाने, गवताच्या गंजी, कारखाने आदींचा समावेश आहे. त्यामुळे मुळशी तालुक्यासाठी स्वतंत्र व खास करून पिरंगुट येथे मध्यवर्ती भागात एक अग्निशमन केंद्र उभारणे गरजेचे आहे.

Fire Brigade
कोरोनामुळे 33 हजार मुले मूळ शाळेला मुकणार

पिरंगुट परिसरात मोठ्या प्रमाणात कंपन्या असताना मोठे नुकसान तसेच जीवितहानी टाळण्यासाठी या भागात अग्निशमन केंद्राची अत्यंत गरज आहे. पिरंगुटला केंद्र झाल्यावर त्या केंद्राची देखभाल करण्यासाठी जो खर्च येईल, तो खर्च कारखानदार द्यायला तयार आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तो खर्च टॅक्स स्वरूपात जमा करून घ्यावा, म्हणजे अग्निशमन केंद्राच्या देखभालीच्या खर्चाचा प्रश्न मार्गी लागेल.

- श्रीधर जोशी, कारखानदार

पिरंगुटला अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी पीएमआरडीने जागा उपलब्ध करून द्यावी आणि त्यासाठी खर्चही पीएमआरडीने करावा. मुळशी तालुक्यापासून पीएमआरडीला मोठे उत्पन्न मिळते, मात्र त्याबदल्यात खर्च केला जात नाही. आम्ही पक्षाच्या माध्यमातून

मुख्यमंत्र्यांना विनंती करून त्यात लक्ष घालायला लावू.

- बाळासाहेब चांदेरे, जिल्हाप्रमुख शिवसेना

मी २०१२ मध्ये पंचायत समितीचा उपसभापती असताना पंचायत समितीत ठराव करून पिरंगुट परिसरात अग्निशमन केंद्राची मागणी केली होती. परंतु, अद्याप त्यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही.

- महादेव कोंढरे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

भरे येथील गायरानात अग्निशमन केंद्रासाठी जागा प्रस्तावित झालेली असून, त्याचे काम प्रगतिपथावर आहे.

- गंगाराम मातेरे, मुळशी तालुकाध्यक्ष, कॉंग्रेस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()