पुणे : शुक्रवार पेठेतील (shukrawar peth) एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून 14 वर्षीय मुलीचा तोल जाऊन खिडकीच्या लोखंडी जाळीमध्ये अडकली. या घटनेची माहिती मिळताच काही वेळातच अग्निशामक दलाच्या (fire brigade) जवानांनी घटनास्थळी पोचले. त्यांनी काही मिनीटातच मुलीची सुखरुप सुटका केली. अग्निशामक दलाच्या शीघ्र प्रतिसादामुळे गंभीर दुघर्टना टळली. (fire brigade rescue girl trapped forth floor pune)
शुक्रवार पेठेतील एका पाच मजली इमारतीमध्ये ऋतिका जगदाळे (वय 14) हि मुलगी तिच्या कुटुंबीयांसमवेत राहते. सोमवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ती पाचव्या मजल्यावर गेली, तेव्हा तिचा तोल जाऊन ती चौथ्या मजल्यावरील खिडकीच्या जाळीजवळ अडकली असल्याची खबर अग्निशामक दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखुन अवघ्या काही मिनीटातच मध्यवर्ती अग्निशमन केंद्राचे अधिकारी सचिन मांडवकर, तांडेल कैलास पायगुडे, राहुल नलावडे, अतुल खोपडे, मारुती देवकुळे, किशोर बने आदी घटनास्थळी पोचले. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील एका सदनिकेच्या खिडकीच्या जाळीजवळ ऋतिका अडकली होती.
एका महिलेने त्यांच्या खिडकीतुन तिच्यापर्यंत साडी सोडली होती, त्यामुळे ती साडीला धरून लटकली होती. तिचा तोल गेल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची दाट शक्यता होती. त्याची काळजी घेऊन अग्निशामक दलाच्या जवानांनी तळमजल्यावर तत्काळ जाळी लावली. त्यानंतर खिडकीच्या जाळीला धरुन थांबलेल्या मुलीला सोडविण्यासाठी इमारतीच्या छतावरुन दोरखंड सोडण्यात आला. त्याचबरोबर खालून शिडी देखील लावण्यात आली. अग्निशामक दलाचे जवान देवकुळे हे दोरखंडाला पकडून मुलीजवळ पोचले. त्यांनी दोरखंड तिच्याभोवती गुंडाळून शिडीच्या सहाय्याने तिला खाली उतरवून तिचा जीव वाचविला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.