पुणे - एका बंद सदनिकेत बेशुद्धावस्थेत असलेल्या बहीण-भावाला अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळेत रूग्णालयात दाखल करून त्यांना जीवदान दिले. ही घटना वानवडीमधील विकासनगर येथील कृष्ण कन्हैया सोसायटीत दुसऱ्या मजल्यावर रविवारी (ता. ३) रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास घडली.