अग्निशमन यंत्र हाताळणीत शिक्षक ‘नापास’

Fire fighting equipment
Fire fighting equipment
Updated on

दावडी - प्रत्येक शाळेत अग्निशमन यंत्रणा असावी, वेळोवेळी पाहणी करून ती अपडेट केली जावी, असे सरकारचे निर्देश आहेत. मात्र, खेड तालुक्‍यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळांतील अग्निशमन यंत्रांचे गॅस रिफिलिंग वेळेवर केले जात नाही; तसेच हे यंत्र कसे हाताळावे, याचे प्रशिक्षण अनेक शिक्षकांना मिळालेले नाही. 

खेड तालुक्‍यात जिल्हा परिषदेच्या ४०३ शाळा असून, सर्व शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी गॅसचा वापर केला जातो. पोषण आहार शिजवणाऱ्या बहुतांशी महिला बचत गटांमार्फत काम करीत आहेत. अनेक शाळांमध्ये संगणक व विद्युत उपकरणे कमी अधिक प्रमाणात आहेत.

अचानक काही कारणामुळे लागलेली आग त्वरित विझविण्यासाठी अग्निशामक यंत्र प्रत्येक शाळेत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

नियमानुसार या यंत्रांमधील गॅस अकरा महिन्यांनी नव्याने भरणे आवश्‍यक असते; परंतु बहुतांशी शाळांतील यंत्र रिफिलिंग वेळेवर केले जात नसल्याचे दिसून येते. आग लागल्यानंतर यंत्र कसे हाताळावे, याचे शाळेत असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे बंधनकारक आहे. मात्र, प्रत्येक शाळेतील एकाच शिक्षकाला प्रशिक्षण दिले आहे. प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांनाही अग्निशामक यंत्र कसे हाताळावे, याची माहिती व्यवस्थित सांगता येत नाही; तसेच पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांनाही हे यंत्र वापरायची माहिती नाही. अग्निशामक यंत्र भिंतीवर उभ्या स्थितीत ठेवले पाहिजे, मात्र अनेक शाळांत ते कपाटाखाली, अडगळीत व टेबलामागे ठेवलेले आढळते. अनेक यंत्रांवर असलेले माहितीचे स्टिकर गायब, तर काही खराब झाले असून त्यावरील माहिती वाचता येत नाही; तर काही यंत्राचे पाइप गायब आहेत.

अग्निशमन यंत्रणा वापरण्याचे प्रशिक्षण तालुक्‍यातील मोजक्‍याच शिक्षकांना मिळालेले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व शिक्षकांना प्रशिक्षण मिळाले पाहिजे, असे अनेक शिक्षकांनी सांगितले.

केंद्र स्तरावर अग्निशमन यंत्राच्या प्रशिक्षणाबाबत माहिती घेऊन ज्यांना प्रशिक्षण दिले नाही, त्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे आदेश दिले जातील. ज्या काही त्रुटी असतील त्या लवकरच दूर केल्या जातील.
- संजय नाईकरे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, खेड 

अग्निशमन यंत्र कार्यालयात
किचन शेडमध्ये पोषण आहार शिजवला जात असल्यामुळे त्या ठिकाणी अग्निशमन यंत्र ठेवले पाहिजे. मात्र, चोरीच्या भीतीने हे यंत्र कार्यालयात ठेवण्यात आलेले आहे. काही शाळांत अग्निशमन यंत्र शोधायला दहा मिनिटे वेळ गेला. या यंत्राची शाळा व्यवस्थापनासह अग्निशामक दलाकडून नियमित तपासणी होणे गरजेचे आहे. मात्र तशी तपासणी होत नसल्याचे दिसून आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()