पुणे : राज्यातील लाखो विद्यार्थी यंदाही शाळेचा पहिला दिवस साजरा करतील...! होय, हे खरं आहे. पण हा पहिला दिवस कसा असेल माहितीयं का!! तर हा पहिला दिवस विद्यार्थी घर बसल्या साजरा करून शकतील. शाळेची घंटा नियमितपणे "डिजीटल'वर वाजेल आणि कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेल्या शाळांमधील अध्यापन पुन्हा सुरू एकदा होईल. शाळेच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 15 जूनपासूनच अध्यापन सुरू करण्याची तयारी सध्या शाळा स्तरावर सुरू आहे.
फक्त फरक इतकाचं की ही तयारी "डिजीटल प्लॅटफॉर्म'वर शाळा भरविण्याची आहे. उच्च शिक्षणातील शैक्षणिक वर्ष 2020-21 यंदा सप्टेंबरपासून सुरू होत असले तरीही, शालेय शिक्षणातील शैक्षणिक वर्ष मात्र नियमितपणे 15 जुनपासूनच सुरू होत आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शाळा करतायंत ही तयारी :
- शाळांमध्ये होतोय "डिजीटल प्लॅटफॉर्म' कार्यन्वित
- अभ्यास गटामार्फत वेगवेगळ्या ऍप्स्, सॉफ्टवेअरची केली जातीयं पडताळणी
- शिक्षकांचे डिजीटल प्रशिक्षण सुरू
- विद्यार्थी-पालकांची साधला जातोय संवाद
- डिजीटल शिक्षणासाठी पालकांकडे कोणती उपकरणे उपलब्ध आहेत, या माहितीचे संकलन
- घरबसल्या शिक्षकांचे विषयानुसार बनविले जातायेत पीपीटी, ध्वनीचित्रफित, ध्वनीफित
अय्या खरंच, तुळशीबाग सुरू होत आहे...
शाळांचे म्हणणे :
'डिजीटल शाळा' भरविण्याचे नियोजन पूर्ण
""शाळा नियमितपणे 15 जुनला सुरू करायच्या झाल्यास काय काळजी घ्यायची. ई-लर्निंग कसे करायचे याचे नियोजन पूर्ण झाले आहे. पालकांकडे कोणती आधुनिक उपकरणे आहेत, याचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी "डिजीटल प्लॅटफॉर्म' विकसित करण्यात येईल. सध्या शिक्षक प्रबोधिनीमार्फत संस्थेच्या एकूण 75 शाळांमधील शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कसे शिकवावे, याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामध्ये पीपीटी, व्हिडिओ कसे तयार करावेत, हे सांगितले जात आहे.''
- सचिन आंबर्डेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी
पुणे : कोथरूडवरील विघ्न थोडक्यात टळले; पहाटेपर्यंत चादणी चौकात होते चिंतेचे वातावरण
"आम्ही व्हॉटस्ऍप ग्रुपद्वारे अभ्यास सुरू ठेवला आहे. दिक्षा ऍप, ईझी टेस्ट ऍप, शिक्षकांनी तयार केलेल्या ध्वनीफित, ध्वनीचित्रफित याद्वारे अध्यापन चालू करण्यात येईल. विद्यार्थी आणि पालकांचे समुपदेशन करणार आहोत. त्यासाठी पालकांशी ऑनलाईनद्वारे संवाद साधण्यात येणार आहे.''
- संजीवनी ओमासे, मुख्याध्यापिका, नुतन मराठी विद्यालय (मुलांची)
पुणे : कोथरूडवरील विघ्न थोडक्यात टळले; पहाटेपर्यंत चादणी चौकात होते चिंतेचे वातावरण
राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी म्हणाले :-
- दुरदर्शन आणि आकाशवाणीद्वारे अध्यापन करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू
- दुरदर्शनच्या दोन वाहिन्या आणि बारा तास मिळावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.
- नागपूर, परभणीमध्ये कम्युनिटी रेडिओद्वारे अध्ययनाचा प्रयत्न सुरू; त्याप्रमाणे अन्य शहरे आणि गावांमध्येही कम्युनिटी रेडिओचा वापर करण्याचा विचार
- स्थानिक केबल नेटवर्क चालकांशी साधला जातोय संवाद
- ऑनलाईनपेक्षा दुरदर्शन, आकाशवाणी याला प्राधान्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.