जुन्नरमध्ये प्रथमच आढळले "रक्तलोचन घुबड"

जगातून केवळ भारतातच आढळणारे प्रदेशनिष्ठ
रक्तलोचन घुबड
रक्तलोचन घुबड sakal
Updated on

पिंपळवंडी : जैवविविधतेने संपन्न असलेल्या जुन्नर तालुक्यातील जंगलात रक्तलोचन हे दुर्मिळ घुबड जुन्नरचे स्थानिक प्राणीमित्र विजय वायाळ यांना दिसले.विजय वायाळ हे पक्षीनिरीक्षणासाठी गेले असता गर्द झाडीत त्यांना या घुबडाचे दर्शन झाले प्रथम दर्शनी हे शृंगीघुबड असावे असा त्यांनी अंदाज बांधला दुर्बिणीच्या सहाय्याने त्यांनी ते घुबड पाहिले असता हे दुर्मिळ रक्तलोचन घुबड असल्याचे त्यांच्या लक्षात आले व त्यांनी याबाबत वनविभागाला माहिती कळवली व जुन्नर मध्ये यापुर्वी कोणीही या घुबडाची नोंद केली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या घुबडाची नोंद केली.

विजय वायाळ यांनी सांगितले की रक्तलोचन घुबडाचे इंग्रजी नाव -"mottled wood owl" हे असुन हे घुबड़ ओळखण्याची खूण म्हणजे याच्या वरील बाजूस पांढरे व तांबूस चट्टे असतात.तर खालील बाजू पांढुरकी असून त्यावर गडद तपकिरी रेषा तसेच लालसर-तपकिरी चट्टे व पट्टे असतात. फिक्कट चपट्या चेहऱ्यावर काळ्या वर्तुळाकार रेषा व डोळे गडद असतात.त्याचा आवाज ‘व्हऽ -आ-आ-आ’ असा कंपनयुक्त असतो.अधिवास खुली जंगले, शेती प्रदेश तसेच ग्रामीण भागातील वनराया येथे असतो.

या घुबडांची संख्या स्थिरअसुन हा निशाचर पक्षी असुन दिवसा विश्रांती व रात्री शिकार करतो. खारी, छोटे सरपटनारे प्राणी, उंदीर, सरडे, खेकडे, कीटक हे याचे मुख्य खाद्य आहे.

दुर्मिळ होत चाललेले हे रक्तलोचन घुबड जुन्नर तालुक्यात आढळल्याने येथील प्राणीमित्र तसेच पक्षी अभ्यासकांनी आनंद व्यक्त केलेला असुन जुन्नर मध्ये हे घुबड आढळणे याचा अर्थ येथील वातावरण हे पशुपक्षांसाठी अगदी योग्य असुन हि जैवविविधता जपण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.

प्रतिक्रिया.

महाराष्ट्रात पंधरापेक्षा जास्त प्रकारच्या घुबडांची नोंद झाली आहे. अधिवासानुसार घुबडांचे प्रकार बदलतात. पश्चिम घाटात पिंगट वन घुबड, मत्सघुबड, महाकौशिक, बहिरी घुबड, पट्टेरी रान पिंगळा, हुमा घुबड अशी विविध प्रकारची घुबड बघायला मिळतात. शहराजवळ मुख्यतः गव्हाणी घुबड, पिंगळा वास्तव्यास असतात. तसेच, हिवाळी घुबड, शिंगळा, तांबूस शिंगळा हे पक्षी स्थलांतरासाठी आपल्याकडे येतात.

वेगाने नष्ट होत असलेली माळराने, गवताळ प्रदेश, गावालगतच्या रिकाम्या जागांवर वाढत चालले मानवी अतिक्रमण शेतातल्या मोठ्या झाडांची होत असणारी कत्तल ह्यामुळे ह्या घुबडांचा अधिवास धोक्यात आला आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या घुबडांची तस्करी करणारे मोठे जाळे महाराष्ट्रात आजही सक्रिय आहे. झाडांच्या ढोलीवर नजर ठेवून लोक रात्रीच्या वेळी घुबडांची पिल्ले पळवतात.

ह्या सर्व कारणांमुळे रक्तलोचन घुबड दिसणे खूप दुर्मिळ झाले आहे.

सुभाष कुचिक (पक्षी अभ्यासक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.