Video: भन्नाट! दुमजली इमारतीचं होणार स्थलांतर; बारामतीत होतोय पहिलाच प्रयोग

जॅक आणि चॅनेलच्या साह्यानं तीन हजार चौरस फुटाची इमारत उचलून इतरत्र स्थलांतरित करणार
Baramati building relocation video
Baramati building relocation video
Updated on

Baramati Building Relocation Video: बांधकाम क्षेत्रानं आता खूप मोठी झेप घेतली आहे. चक्रावून जाऊ अशा उत्तुंग इमारती आणि बरंच काही या क्षेत्रात सध्या पहायला मिळतं आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानानं मनुष्याचं जीवन सुखमय बनवलं आहे.

बांधकाम क्षेत्रातला असाच एक आश्चर्यचकीत करणारा प्रयोग पुणे जिल्ह्यातील बारामतीत पाहायला मिळणार आहे. हा प्रयोग म्हणजे दोन मजली इमारत चक्क उचलून 9 फूट मागे नेण्यात येणार आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून उत्सुकतेपोटी ही प्रक्रिया पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत.

Baramati building relocation video
Aditya Thackeray: फडणवीस घेणार आदित्य ठाकरेंच्या लग्नाची जबाबदारी! विधानसभेत काय घडलं पाहा

का होतोय हा प्रयोग?

काटेवाडी (ता.इंदापूर) इथं मुलाणी कुंटुबाने वडिलांची आठवण जोपसण्यासाठी रस्ता रुंदीकरणात जाणारी इमारत वाचवण्यासाठी हा प्रयोग करुन पाहण्याचं ठरवलं.

त्यानुसार, रस्त्यामध्ये येणारी दोन मजली इमारत मूळ जागेपासून चक्क 9 फुट पाठीमागे सरकरविण्याच्या कामास सुरवात झाली आहे. सध्या ही इमारत मूळ जागेपासून 6 इंच उंच उचलण्यात आली असून 5 फुटापर्यंत उंच उचलून ती जॅक आणि चॅनेलच्या साहय्यानं पाठीमागे सरकवण्यात येणार आहे.

Baramati building relocation video
Rahul Gandhi: "Modani मॉडेल! पहिल्यांदा लुटा मग शिक्षेविना सुटा"; राहुल गांधींचा पुन्हा संताप

पालखी मार्गाच्या रुंदीकरणाचं काम जोरात

बारामती आणि इंदापूर तालुक्यात संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचं काम वेगानं सुरु आहे. महामार्गातील जमिनीचं अधिग्रहण झालं असून रस्त्यामध्ये येणाऱ्या इमारती पाडण्यात आल्या आहेत. याची नुकसान भरपाई संबंधितांना देण्यात आली आहे. काटेवाडी गावात पालखी महामार्गाचं काम वेगाने सुरु आहे.

काटेवाडी गावाजवळील मुलाणी कुंटुबानं मात्र एक अनोखा प्रयोग राबविण्यास सुरवात केली आहे. सुरुवातीला मुलाणी कुटुंबानं प्रतिकूल परिस्थितीत 'आशियाना कॉम्प्लेक्स' नावाची दुमजली इमारत रस्त्यालगतच्या आपल्या जागेत उभारली होती. ज्यांच्या इच्छेनं ही इमारत उभी राहिली ते दादासाहेब मुलाणी यांचं चार वर्षापूर्वी निधन झालं. (latest Marathi News)

पण आता हीच इमारत नेमकी पालखी महामार्गाच्या रुंदीकरण प्रकल्पात आली आहे. त्यामुळं इमारतीचा सुमारे ९ फुटचा भाग रस्त्यात जाणार असल्यानं मुलाणी कुंटुबाला इमारत पाडवी लागणार होती.

मात्र, वडिलांची ही स्मृती जपण्यासाठी तसेच इमारतीच्या माध्यमातून वडिलांची आठवण कायमस्वरुपी जतन करण्याची मुलाणी कुटुंबाची मोठी इच्छा होती.

यासाठी काय करता येईल याचा विचार सुरु असतानाच त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पाहिला, यामध्ये आजवर अचल समजली जाणारी इमारतही एका जागेवरुन दुसऱ्या जागी स्थलांतरीत करता येते हे पाहिलं. त्यानंतर आपली इमारतही अशाच प्रकारे रुंदीकरण मार्गातून हालवून ती वाचवण्याचा निर्णय घेतला.

Baramati building relocation video
Nitin Gadkari: नितीन गडकरींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! दोन फोन कॉल्समुळं खळबळ

महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग

यासाठी व्हिडिओमध्ये ज्या कंपनीनं इमारत हालवण्याचं काम केलं होतं त्या हरयाणातील एका कंपनीला हे काम देऊ केले. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काटेवाडीतील ही दुमजली इमारत हालवण्याचं काम प्रत्यक्षात काम सुरु झालं आहे.

आत्तापर्यंत मूळ जागेपासुन ३ इंच इमारत वरती उचलण्यात आली असून अशा प्रकारे ती 5 फुटांपर्यंत वर उचलून 9 फुटे मागे सरकविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग असल्यानं नागरिकामध्ये या प्रयोगाची प्रचंड उत्सुकता आहे, त्यामुळेच हे काम पाहण्यासाठी लोक मोठी गर्दी करत आहेत.

हेही वाचा - झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

नवीन इमारतीच्या तुलनेत खर्च कमी

आशियाना मंझिल इमारतीचे मालक हसन मुलाणी यांनी सांगितलं की, "आमची तीन हजार चौरस फुटाची दोन मजली इमारत पालखी महामार्गाच्या रुंदीकरणामध्ये ९ फुट जात होती. इमारत पाडून नव्याने बांधणे खर्चिक आहे.

तसेच इमारतीमध्ये वडिलांच्या आठवणी असल्यामुळं आम्ही इमारत पाठीमागे सरकविण्याचा निर्णय घेतला असून याची माहिती सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्हाला मिळाली. इमारत सरकविण्यासाठी १५ लाख मजूरी देण्यात येणार असून साहित्य आम्ही पुरविणार आहोत. नवीन इमारतीच्या तुलनेमध्ये हा खर्च कमी असल्याचंही त्यांनी सांगितल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.