पुणे : फायर अॅन्ड सेफ्टी असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने ‘सर्वोत्कृष्ट भारतीय कौशल्य आणि प्रतिभा’ (फिस्ट) पुरस्कार प्रदान करण्यात आले. नावीन्यपूर्ण उत्पादन विभागामध्ये विघ्नहर्ता टेक्नॉलॉजी यांना तर, निर्धोक आणि सुरक्षित विभागामध्ये कोलते पाटील टाउनशिपला पुरस्कार मिळाला. तसेच, फ्रंटलाईन वॉरिअर विभागामध्ये एसके सौरिओ हिटलर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नागरिकांमध्ये आग प्रतिबंध आणि सुरक्षेच्या दृष्टीने असोसिएशनच्या वतीने चर्चासत्र आणि पुरस्कार वितरणाचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रात ऑनलाइनद्वारे खासदार गिरीश बापट, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, व्हीके ग्रुपचे अध्यक्ष विश्वास कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. या वेळी ‘पीएमआरडीए’चे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, पुणे महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांचा सन्मान करण्यात आला.
असोसिएशनचे शहराध्यक्ष नितीन जोशी, सचिव अर्चना गव्हाणे, अजित यादव, महेश गव्हाणे, अमोल उंबरजे, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे अशोक अटकेकर, पूजा गायकवाड, सिम्पल जैन, अनुजा करहू, रवी कुमेरिया, हबीब शेख तसेच वीरेंद्र बोराडे आणि त्रिलोक तिवारी या वेळी उपस्थित होते.
"फायर सेफ्टी हा विषय औद्योगिक क्षेत्रापुरता न राहता त्याची व्याप्ती वाढली आहे. माणसाचे जीवन सुखकर होण्यासाठी अधिक सुरक्षित असणे गरजेचे आहे. कोरोना काळात काही रुग्णालयांमध्ये आगीच्या घटना महाराष्ट्र विसरू शकला नाही. त्यामुळे अग्नी प्रतिबंधक सुरक्षेच्याबाबत अधिक संशोधनासाठी या विषयाचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश होणे गरजेचे आहे."
- गिरीश बापट, खासदार
"वृद्ध, गर्भवती महिला आणि लहान मुलांच्या सुखकर भविष्यासाठी निवासी किंवा औद्योगिक बांधकामावेळी अग्निप्रतिबंध आणि सुरक्षिततेचा आग्रह धरण्याची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या सुरक्षिततेबाबत जागृत राहावे."
- कृष्ण प्रकाश, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड
"शहरामधील वाढत्या लोकसंख्येमुळे सध्या उंच इमारती बांधण्याकडे कल आहे. बांधकाम व्यावसायिकांनी केवळ पैसे कमावणे हा उद्देश न ठेवता केलेल्या कामाचा अभिमान आणि समाधान लाभण्याचे उद्दिष्ट्य ठेवावे. बांधकामामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेत आर्किटेक्ट्सनी आग प्रतिबंध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे."
- विश्वास कुलकर्णी, आर्किटेक्ट
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.