पुणे - महापालिका प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या शहरातील विविध ठिकाणचे हौद, लोखंडी हौद, पाण्याच्या टाक्या अशा ठिकाणी सुमारे पाच लाख ५९ हजार ९५२ इतक्या गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी १ लाख ७६ हजार ६७ मूर्तींचे संकलन करण्यात आले..महापालिका प्रशासनाकडुन शहरातील नदीकाठावर बांधलेले हौद, लोखंडी हौद तसेच आवश्यक तेथे पाण्याच्या टाक्या विसर्जनासाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यानुसार, मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती मुर्तीचे विसर्जन करण्यात आले. मानाच्या गणपतीसह प्रमुख गणेशोत्सव मंडळांकडुनही हौदामध्ये मूर्ती विसर्जन करण्यात आली. त्यानुसार, घरगुती गणपती विसर्जनाला देखील भाविकांनी हौदामध्येच विसर्जन करण्यास प्राधान्य दिले..अनंत चतुर्दशीच्या दिवशी बांधलेल्या हौदात ७५ हजार ६४१, लोखंडी टाक्यात १ लाख ७६ हजार ४३०, संकलन केलेल्या मूर्ती १ लाख २२ हजार ७७ अशा एकूण ३ लाख ७४ हजार १४८ इतक्या मूर्तींचे विसर्जन केले. अनंत चतुर्दशीसह एकूण गणेशोत्सवामध्ये ५ लाख ५९ हजार ९५२ हजार इतक्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. १ लाख ७६ हजार ६७ इतक्या मूर्तींचे संकलन करण्यात आले. संकलन केलेल्या मूर्तींचे वाघोली येथील खाणीत विसर्जन करण्यात येणार आहे..'अनंत चतुर्दशीसह संपुर्ण गणेशोत्सव कालावधीत १ लाख ७६ हजार ६७ मूर्तींचे संकलन करण्यात आले. संकलीत केलेल्या मूर्तींचे वाघोली येथील खाणीत विसर्जन केले जाणार आहे.'- संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, महापालिका..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.