खडकवासला धरणातून पाच हजार ९९२ क्यूसेक विसर्ग

सात दरवाजे एक फुटाने उघडले आहेत
Five  thousand 992 cusecs Water discharged from Khadakwasla dam
Five thousand 992 cusecs Water discharged from Khadakwasla dam
Updated on

खडकवासला - खडकवासला धरण साखळीत चार धरणांपैकी खडकवासला धरण सोमवारी रात्री बारा वाजता ९० टक्के तर मंगळवारी सकाळी सहा वाजता ९४ टक्के भरले आहे. खडकवासला धरणातून १२ वाजता पाच हजार ९९२ क्यूसेक पाणी सोडले असून सात दरवाजे एक फुटाने उघडले आहेत.

खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी सांगितले की, "खडकवासला धरणाची पातळी ९५ टक्के कायम ठेवण्यासाठी दरम्यान, पावसाचा जोर वाढल्यास धरणातील विसर्ग वाढवण्यात येईल. पाऊस कमी झाल्यास विसर्ग कमी करण्यात येणार आहे.

मागील तीन दिवस खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत होता. परिणामी खडकवासला धरणातील उपयुक्त पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. सोमवारी संध्याकाळी पाच वाजता १.४९ टीएमसी म्हणजे ७५.६० टक्के पाणी साठा जमा झाला होता. पाऊस सुरू होता. धरणात येवा ही वाढला होता. पावसाचा जोर पुढील पाच सहा तास कायम राहिला तर धरण पूर्ण भरेल, अशी परिस्थिती असल्याने धरण ९० टक्के झाल्याने धरणातून ८५६ क्यूसेक पाणी मुठा नदीत सोडण्यात आले.

मंगळवारी सकाळी सहा वाजता १.८६ टीएमसी म्हणजे ९४.०८ टक्के पाणीसाठा जमा झाला होता. पाण्याची ही पातळी कायम ठेवायची असल्याने धरणातील विसर्ग सकाळी सहा वाजता दोन हजार ५६८ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. यासाठी धरणाच्या अकरांपैकी तीन दरवाजे एक एक फुटाने उघडली आहेत.

चार ही धरणातील सकाळी सहा वाजताची स्थिती

धरणाचे नाव / मागील २४ तासतील पाऊस (मिलिमीटर मध्ये) / उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी)/ टक्केवारी/ विसर्ग

खडकवासला- 60/ 1.86/ 94.08

कालव्यातून 905, धरणातून नदीतील 2568

पानशेत 141/3.81/35.82/0

वरसगाव- 137/853/4.30/33.58/ 0

टेमघर- 170/1013/0.81/21.88/0

चार धरणात एकून 10.79 टीएमसी/37.01टक्केवारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.