पुणे - हिंगण्यातील तळजाई टेकडीचा मागचा भागाचे भूमाफियांकडून सपाटीकरण केले जात आहे. त्यामुळे भविष्यात भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. पुणे महापालिका, वनविभागाने तातडीने येथील डोंगरफोड रोखून उपाययोजना करावी..अन्यथा वायनाड सारखी दुर्घटना घडेल अशी मागणी पर्यावरणप्रेमी अनंत घरत यांनी महापालिका आयुक्त आणि हवेली तहसीलदारांकडे केली आहे. तसेच पालकमंत्री अजित पवार यांच्याकडेही पुण्यासाठी ‘लाडका डोंगर योजना' सुरु करावी अशी मागमी केली आहे.पुण्यातील टेकड्यांवर बीडीपी आरक्षण असताना अनधिकृतपणे प्लॉटिंग करून सामान्य जनतेची व प्रशासनाची मोठी फसवणूक भूमाफिया करत आहेत. हिंगणे खुर्दमधील अथर्व नगर जवळील विकास आराखड्यात असलेला नैसर्गिक ४० फुटी नाला भूमाफियांनी बुजविला आहे..तसेच तळजाईच्या डोंगरातून येणारे धबधबे, जिवंत झरे, प्रवाह यांचे डोंगर फोडीमुळे नष्ट झाले आहेत. डोंगरफोडीतून गौणखानिज मुरूम उत्खनन करुण शेकडो ट्रक विकले गेले आहे. त्याला जबाबदार असलेल्यांवर प्रशासनाकडून कोणतेही कारवाई केली जात नाही.जागा मालक व विकसकाने तळजाई टेकडीच्या वन विभागाच्या भिंतीपासून टेकडी फोडून पूर्णपणे सपाटीकरण केले आहे. त्यामुळे जास्त पाऊस झाला तर वनविभागची भिंत कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वायनाड सारखी दुर्घटना हिंगणे खुर्द येथे होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने संबंधितांवर करवाई करावी अशी मागणी घरत यांनी केली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.