वाघोली : प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे लाखो अनुयायी यंदा पेरणे टोल नाक्यापर्यंत ‘पीएमपी’ बसने पोहोचले. तेथून विजयस्तंभापर्यंत पायी जाऊन त्यांनी अभिवादन केले. दरवर्षी अनुयायांची होणारी आळंदी फाटा ते टोल नाका ही दीड किलोमीटरची पायपीट यामुळे वाचली.
लोणीकंदच्या पुढे खासगी पार्किंगची अनेक ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. तेथे खासगी वाहनांसाठी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. तेथूनच पुढे पेरणे टोल नाक्यापर्यंत ‘पीएमपी’ बसची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे आळंदी फाटा ते टोल नाक्यापर्यंत अनुयायांसाठी रस्त्याच्या दुतर्फा दोरी लावून चालण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. तर बस जाण्यासाठी दोन्ही बाजूने जागा मोकळी सोडण्यात आली होती. यामुळे बस टोल नाक्यापर्यंत अनुयायांना सोडत होत्या. तेथून पुढे प्रचंड गर्दी असल्याने पायी जाण्याशिवाय पर्याय नव्हता.
‘पीएमपी’च्या बस सेवेमुळे अनुयायांची काही किलोमीटरची पायपीट वाचली. जिल्हा प्रशासन, ‘पीएमपी’चे कर्मचारी व पोलिस प्रशासन यासाठी परिश्रम घेत होते. शहरातून येणाऱ्या बससाठी पार्किंगची व्यवस्था होती. त्या बसमधील अनुयायी पार्किंगमध्ये सोडून तेथील दुसऱ्या बसने टोल नाक्यापर्यंत पाठविले जात होते. टोल नाका ते विजयस्तंभादरम्यान विक्रेत्यांना दुभाजकावर तसेच महामार्गावर दुकाने लावण्यास बंदी केली होती. .
यंदा नियोजन कोलमडले नाही
‘पीएमपी’ बसचे दरवर्षी नियोजन केले जाते. मात्र, सकाळी ११ नंतर गर्दीमुळे बस लोणीकंद येथील आळंदी फाट्याच्या पुढे जातच नव्हत्या. त्यामुळे टोल नाक्यापर्यंत बसचे नियोजन कोलमडत होते. यंदाच्या नियोजनामुळे तसे झाले नाही. अनुयायी घेऊन बस टोल नाक्यापर्यंत पोहोचल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.