कोथरूड : पानशेत धरणाचे फोटो घेण्यासाठी मित्रांसोबत डोंगर माळावर गेलेले हौशी संशोधक, वृत्तपत्र विक्रेते मंगेश नवघणे यांना पाण्याच्या तळ्याजवळ कातळ शिल्पे कोरलेली आढळली. रिंग असलेले कप, जोडलेले कप, शेपटी कप, एक केंद्री वर्तुळ, कोन या कातळ शिल्पात आढळल्या.
नवघणे म्हणाले, ‘‘हवेली व वेल्हे तालुक्यांच्या हद्दीवर असणाऱ्या आंबी व कादवे या दोन्ही गावांच्या सीमेवरील डोंगरावर असलेल्या खडकाच्या पृष्ठभागावर प्राचीन कालीन कोरलेली काही रेखाटने सापडली आहेत.’’ या वेळी माझ्यासोबत स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय जागडे व मुळशी उपाध्यक्ष अनिल कडू उपस्थित होते.
नवघणे हे भारत इतिहास संशोधक मंडळाचे आजीवन सदस्य आहेत. ऐतिहासिक किल्ले, वीरगळ, शिल्पांचा अभ्यास हा त्यांच्या आवडीचा विषय. नवघणे म्हणाले, ‘‘सिंहगड व परिसरात प्रागैतिहासिक कालीन मानवाचा अधिवास होता. यासंदर्भात अभ्यासक नंदकिशोर मते यांनी संशोधन करून आपली निरीक्षणे नोंदवली होती. आता अशी शिल्पे विविध भागांत आढळत आहेत. त्यामुळे या शिल्पांची पाहणी करून त्यांचे संरक्षण व्हावे व त्यावर संशोधन करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या तर अनेक नव्या गोष्टी उजेडात येतील.’’
मंगेश नवघणे म्हणाले, ‘‘संशोधकाच्या मते आदिमानव शिकार करून सखल पाणवठा भागात सुरक्षेसाठी उंचावरील सपाट जागेवर वास्तव करण्यास येत असावेत. वास्तव्यासाठी ही जागा सुरक्षित असल्या कारणाने येथे अधिकाधिक वावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कालावधीत काळ्या खडकावर अणुकुचीदरा हत्याराने संवादासाठी किंवा आदिमानवांना व्यक्त होण्यासाठी ही चिन्हे कोरली आहेत. त्यात आकाश निरीक्षण, तारे, हवामान, ऋतू, पाऊस, पाणीसाठा, जन्म मृत्यू नोंद अशा बाबींशी निगडित शिल्पकाम आढळते. ही शिल्पे पुणे जिल्ह्यात जुन्नर, हवेलीत सापडत होती. आता नव्याने वेल्हे तालुक्यात आढळली आहेत.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.