Rakhi Special : आठ वर्षांपासून प्रत्यक्षात रक्षाबंधन नाही ; डिलिव्हरी बॉयची व्यथा, बहिणी करतात राखी कुरिअर

आपण मागविलेली वस्तू वेळेत मिळावी, अशी अपेक्षा प्रत्येक ग्राहकांची असते. मग ते खाद्य पदार्थ असोत, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे किंवा राखी. विविध वस्तू ऑर्डर करणाऱ्या किंवा पाठविणाऱ्यांची डिलिव्हरी वेळेत पोचविण्याची जबाबदारी डिलिव्हरी बॉय किंवा गर्ल करत असते.
Rakhi Special :
Rakhi Special :sakal
Updated on

पुणे : आपण मागविलेली वस्तू वेळेत मिळावी, अशी अपेक्षा प्रत्येक ग्राहकांची असते. मग ते खाद्य पदार्थ असोत, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे किंवा राखी. विविध वस्तू ऑर्डर करणाऱ्या किंवा पाठविणाऱ्यांची डिलिव्हरी वेळेत पोचविण्याची जबाबदारी डिलिव्हरी बॉय किंवा गर्ल करत असते. अशीच डिलिव्हरी कधी-कधी त्यांना देखील मिळत असते. त्याला निमित्त ठरते रक्षाबंधनाचे.

२०१६ पासून सतीश बल्लाल हे फूड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी शेकडो खाद्यपदार्थांची डिलिव्हरी केली आहे. ही जबाबदारी पार पाडत असताना त्यांना देखील डिलिव्हरी मिळण्याची आतुरता असते. ती म्हणजे रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणी पाठवत असलेल्या राखीची. सतीश यांना सख्खी बहिण नाही. मात्र त्यांच्या दोन्ही चुलत बहिणी त्यांना राखी बांधतात. पण आता त्या महाराष्ट्रात राहात नाहीत. त्यामुळे २०१७ पासून त्यांचे प्रत्यक्षात रक्षाबंधन झाले नाही. मात्र दरवर्षी त्यांच्या बहिणी न चुकता राखी पावतात.

याबाबत सतीश सांगतात की, माझ्या दोन्ही बहिणींचे पती सैन्यात आहेत. त्यांची देशात विविध ठिकाणी बदली होत असते. त्यामुळे आम्हाला दरवर्षी रक्षाबंधनाला भेटता येत नाही. २०१७ पासून मला त्या प्रत्यक्षात येऊन राखी बांधू शकल्या नाहीत किंवा मला त्यांच्याकडे जाता आले नाही. वर्षभर मी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची डिलिव्हरी करत असतो. वस्तू ऑर्डर केल्यापासून ती मिळेपर्यंत ग्राहकांमध्ये काय उत्सुकता असते याची मला जाणीव आहे. तशीच उत्सुकता मला देखील माझी राखी मिळण्याबाबत असते.

सतीश हे विमाननगर परिसरात फूड डिलिव्हरीचे काम करतात. केवळ डिलिव्हरी बॉयच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न कमी असल्याने ते आता एका खासगी कंपनीत नोकरी देखील करत आहे. कामावरून सुटल्यानंतर ते काही तास डिलिव्हरी बॉयचे काम करतात.

माझ्या चुलत बहिणी सध्या पंजाब आणि गुजरातमध्ये राहता आहेत. दाजी सैन्यात असल्याने त्यांची देशात विविध ठिकाणी बदली होत असते. त्यामुळे रक्षाबंधनाच्या निमित्ताने आमची भेट होत नाही. मात्र त्या न चुकता दरवर्षी मला राखी पाठवतात. त्यांनी पाठवलेल्या कुरीअरची मला कायम आतुरता असते. फूड डिलिव्हरीच्या निमित्ताने मला दररोज फिरावे लागते. खाद्यपदार्थ वेळेत मिळाल्यानंतर ग्राहकांच्या चेहऱ्यावर जे समाधान असते ते समाधान, तो आनंद मला रक्षाबंधनाच्या निमित्ताने अनुभवता येतो.

सतीश बल्लाल, डिलिव्हरी बॉय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.