उजनीच्या पाण्यासाठी इंदापूरच्या पश्‍चिम भागामध्ये चक्काजाम आंदोलने

सोलापूरच्या लोकप्रतिनिधींचा निषेध
water isshu
water isshuSakal Media
Updated on

कळस : ''उजनीतून इंदापूरच्या अवर्षणग्रस्त भागाला देण्यात येणारे पाणी हे आमच्या हक्काचे पाणी आहे. त्यास सोलापूरमधून होणारा विरोध हे राजकीय द्वेषापोटी रचलेले षडयंत्र आहे. उजनी धरणामुळे तालुक्यातील विस्थापित झालेल्या लोकांना पाणी मिळत नसल्याची वस्तूस्थिती आहे. मात्र सोलापूरला ऑक्टोबरनंतर धरणाचे पाणी देण्याची तरतूद नसतानाही अनाधिकृतपणे पाणी दिले जाते, ही बाब नियमबाह्य आहे.'' असे सांगत सध्या सोलापूरला नदीतून देण्यात येणारे पाणी बंद करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील यांनी केली आहे. इंदापूरकरांच्या पाण्याला विरोध करणाऱ्यांचा निषेध करत शेतकरी कृती समितीच्यावतीने सुमारे तासभर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

उजनीचे पाणी देण्याचा निर्णय रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर येथील वालचंदनगर-भिगवण रस्त्यावर आज शेतकरी कृती समितीने रास्तारोको आंदोलन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील, कर्मयोगीचे माजी संचालक बाबामहाराज खारतोडे, माजी सरपंच गणेश सांगळे, पोलिस पाटील तुकाराम खाडे यांसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

water isshu
सिंहगडावर अतिक्रमण कारवाईचे संकेत; वन विभागाने कसली कंबर

प्रताप पाटील म्हणाले, ''सोलापूरकरांनी आमची खोडी काढली आहे, त्यामुळे आम्ही गप्प बसणार नाही. खडकवासला धरणसाखळीतील पाणी पुण्याच्या वाढत्या पाणी मागणीमुळे आम्हाला मिळणे मुश्किल झाले आहे. परंतू त्यांनी वापरलेल्या पाण्यापैकी सुमारे ८० टक्के सांडपाणी हे भिमा नदीत येत आहे. हेच सांडपाणी आम्ही शेतीसिंचनासाठी मागणी करत आहोत. त्यास राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पाठपुरावा करुन शेटफळगढे उपसा सिंचन योजनेस मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. मात्र जलसंपदा मंत्र्यांनी हीच सिंचन योजना रद्द करत असल्याचे जाहीर केले. हा प्रकार म्हणजे ताटात वाढलेला घास परत घेण्यासारखा आहे. यामुळे तालुक्यातील ६० हजार एकर क्षेत्राला याचा फटका बसणार आहे. उजनीतून इंदापूरकरांना पाणी देण्यास विरोध करणारे सोलापूरातील लोकप्रतिनीधी उजनीतून बोगस पाणी पळवित असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे सोलापूरकरांना नदीतून देण्यात येणारे पाणी बंद करण्याची आमची मागणी आहे. याशिवाय आम्ही न्यायालयात आमच्या हक्क्याच्या पाण्यासाठी लढा देणार आहोत.

water isshu
पुण्यात पोलिसमित्रांची ‘दादागिरी’

बाबा महाराज खारतोडे म्हणाले, ''केवळ राजकीय व्देषापोटी सोलापूरकरांनी उजनीच्या पाण्याला विरोध केला आहे. त्यास तालुक्यातील काही विरोधक व फुटीर नेत्यांची साथ आहे. तालुक्यातील विरोधकांनी उजनीचे पाणी तालुक्याला मिळण्याबाबतची भूमिका स्पष्टपणे जाहीर करण्याची गरज आहे. ''

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी ''उजनीचे पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे....! उजनीच्या पाण्याला विरोध करणाऱ्या सोलापूरच्या लोकप्रतिनीधींचा निषेध असो...!'' आशा घोषणा दिल्या. वालचंदनगर पोलिसांनी येथे बंदोबस्त ठेवला होता.

water isshu
‘म्युकरमायकोसिस’साठी पुणे महापालिकेची स्वतंत्र नियमावली

भिगवण येथेही राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे रास्ता-उजनी धऱणातील पाच टी.एम.सी. पाणी इंदापुरला देण्याचा निर्णय राज्य शासनाने रद्द केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली भिगवण-शेटफळगढे जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांनी मदनवाडी चौफुला (ता. इंदापुर) येथे रास्ता रोको आंदोलन केले. संतप्त शेतकऱ्यांनी इंदापुरच्या पाण्यास विरोध करणाऱ्यांचा जोडे मारुन व मुंडन करुन निषेध केला. हक्काचे पाणी मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

water isshu
water isshuSakal Media

मदनवाडी चौफुला (ता. इंदापुर) येथे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर,राष्ट्रवादीचे जिल्हा कोषाध्य़क्ष सचिन बोगावत, तालुका उपाध्यक्ष धनाजी थोरात, बाजार समितीचे संचालक आबासाहेब देवकाते, संतोष वाबळे, माजी सभापती हनुमंत वाबळे, तक्रारवाडीचे सरपंच सतीश वाघ, मदनवाडीचे सोसायटीचे चेअरमन विष्णुपंत देवकाते,दादासाहेब वणवे, राजेंद्र देवकाते, अजिंक्य माडगे, सतीश शिंगाडे, संतोष धवडे, जिजाराम पोंदकूले,नितीन काळगे, शरद चितारे, विजयकूमार गायकवाड, रमेश धवडे, संदीप वाकसे, चंद्रशेखर पवार उपस्थित होते.

-बारामती-इंदापूर राज्यमार्ग, बारामती-बावडा व वालचंदनगर-नातेपुते रस्त्यावर रास्तारोको आंदोलने.

-कळंबोलीच्या पुलावर जागरण-गोंधळ आंदोलन करुन ' सरकारला सुबुद्धी दे,शेतकऱ्यांना न्याय मिळू दे ’ची मागणी.

वालचंदनगर : उजनीच्या पाण्यासाठी इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांनी बारामती-इंदापूर रस्त्यावर अंथुर्णे,जंक्शन,लासुर्णे व सणसरमध्ये तर बीकेबीएन रस्त्यावरील निमसाखर व वालचंदनगर-नातेपुते रस्त्यावरील नीरा नदीवरील कळंबोलीच्या पुलावर चक्का जाम करुन रास्ता रोको, बोंबाबोंब,जागरण-गोंधळ आंदोलने करुन ‘ सरकारला सुबुद्धी दे,शेतकऱ्यांना न्याय मिळू दे ’ मागणी करीत राज्यशासनाने रद्द केलेले उजनी जलाशयातील इंदापूरच्या ५ टीएमसी पाण्याचा पुनर्विचार करण्याची मागणी केली.

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या प्रयत्नामुळे इंदापूर तालुक्यातील शेतीच्या सिंचनासाठी पुण्यातून येणाऱ्या सांडपाण्यापैकी ५ टीएमसी सांडपाणी उजनी जलाशयातून उचलण्याच्या योजनेला तत्व:ता मान्यता देवून योजनेचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. मात्र साेलाूपर जिल्हातील शेतकरी व आमदारांनी या योजनेला विरोध केल्यामुळे जयंत पाटील यांनी २२ एप्रिलचा आदेश रद्द करण्याच्या सुचना दिल्या आहेत. याचे पडसाद इंदापूर तालुक्यात उमटू लागले असून आज तालुक्यामध्ये ठिकठिकाणी रास्ता आंदोलने झाली.

निमसाखर मध्ये चक्काजाम आंदोलन...

२२ गावातील शेतकरी पाण्यासाठी गेल्या ५० वर्षापासून आंदोलने करीत आहेत.आंदोलनाची सुरवात करणारी पहिली पिढीतील अनेक आंदोलनकर्ते सध्या हयात नाहीत. दुसऱ्या पिढीतील नागरिक आंदोलन करीत असून तिसरी पिढीही आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. उजनीच्या ५ टीएमसी पाण्यामुळे २२ गावातील पाण्याच्या कायमचा प्रश्‍न सुटला असता मात्र हातातोंडाशी आलेला घास सोलापूरकरांनी हिरावून घेतल्याने शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी बीकेबीएन रस्त्यावर निमसाखरमध्ये चक्काजाम आंदोलन करुन निषेध केला.यावेळी छत्रपतीचे संचालक अभिजित पाटील, सरपंच धैर्यशील रणवरे, युवा नेते विरसिंह रणसिंग, माजी उपसरपंच नंदकुमार रणवरे, पोपट कारंडे, नितीन कदम, चरणसिंग, दीपक लवटे,संजय जाधव,शेखर पानसरे, रणवरे, हर्षल रणवरे आदी उपस्थित होते.

कळंबोलीच्या पुलावर जागरण-गोंधळ...

५ टीएमसी पाण्याचा निर्णय रद्द झाल्यामुळे कळंब परीसरातील शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत सदस्य योगेश डोंबाळे यांच्या नेतृत्वाखाली कळंबोलीच्या पुलावर जागरण-गोंधळ घालून ' सरकारला सुबुद्धी दे,शेतकऱ्यांना न्याय मिळू दे ' असे देवाला साकडे घातले.

तर उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे यांनी उजनीच्या पाण्याबाबत फेरविचार करण्याची मागणी केली. यामुळे पुणे व सोलाूपर जिल्हातील ये-जा करणारी वाहतुक काही काळ ठप्प झाली होती.यावेळी ग्रामपंचायत सदस्य योगेश डोंबाळे,अतुल सावंत महेश बोंद्रे सहभागी झाले होते.तसेच माजी पंचायत समिती सदस्य सुहास डोंबाळे यांच्या नेतृत्वाखाली कळंब ग्रामपंचायतीसमोर बोंबाबोंब आंदोलन करुन शेतकरी काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र डोंबाळे,संदिप पाटील, आप्पासाहेब अर्जुन, रमेश कोळी, ज्ञानेश्वर मेटकरी,संदिप पाटील, नितिन जानकर उपस्थित होते.

अंथुर्णे मध्ये रास्तारोको आंदोलन...

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या भरणेवाडी व अंथुर्णे गावातील शेतकऱ्यांनी अंथुर्णेमध्ये बारामती- इंदापूर राज्यमार्ग रोखून धरुन रास्तारोको आंदोलन केले. यावेळी सरपंच लालासाहेब खरात,माजी सरपंच राहुल साबळे, तानाजी शिंदे, भरणेवाडीचे माजी उपसरपंच गुलाब म्हस्के,अमर बोराटे,शेखर काटे उपस्थित होते.

जंक्शनमध्ये बाेंबाबोंब आंदोलन...

जंक्शन चौकामध्ये शेतकरी कृती समितीच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन व रास्तारोको आंदोलन करण्‍यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील,संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सागर मिसाळ,नागसेन मिसाळ, डॉ.संजीव लोंढे, अक्षय भोसले, संभाजी बनसोडे उपस्थित होते.

लासुर्णेमध्ये चक्काजाम आंदोलन...

लासुर्णे गावामध्ये बारामती -इंदापूर राज्यावर शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन करुन उजनी धरणातील ५ टीएमसी पाणी देण्याची मागणी केली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील, अॅड. तेजसिंह पाटील, संचालक बाळासाहेब पाटील, सरपंच रुद्रसेन पाटील, ग्रामपंचायत सदस्य निखील भोसले,संतोष लोंढे, मनोज कुलकर्णी, हर्षवर्धन लोंढे, उपस्थित होते

सणसरमध्ये सर्वपक्षीय रास्तारोको आंदोलन...

उजनीच्या जलाशयतून ५ टीएमसी मिळावे यासाठी सणसरचे सरपंच अॅड. रणजित निंबाळकर, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन सपकळ, दिपक निंबाळकर, विक्रम निंबाळकर, पार्थ निंबाळकर, बाबाजी निंबाळकर, यशवंत नरुटे, सागर भाेईटे, अभयसिंह निंबाळकर, अमोल भोईटे, सोमनाथ गुप्ते, वसंत जगताप,परशुराम रायते, जाचकवस्तीचे सरपंच सुशिल पवार, उपसरपंच प्रकाश नेवसे यांनी सणसरमध्ये बारामती-इंदापूर राज्यमार्ग रोखून धरुन रास्तारोको आंदोलन केले.

water isshu
पुणे जिल्ह्यात रेशनवर २४ हजार टन धान्याचे मोफत वितरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.