प्रीमियम पेट्रोलची सक्ती ; शहर, उपनगरांत काही पेट्रोलपंप चालकांकडून प्रकार

Force of Premium Petrol from Petrol Pump Owner
Force of Premium Petrol from Petrol Pump Owner
Updated on

पुणे : शहर आणि उपनगरांतील काही पेट्रोलपंप चालकांकडून जाणीवपूर्वक साधे पेट्रोल शिल्लक ठेवून प्रतिलिटर दोन ते तीन रुपये महाग असलेले प्रीमियम पेट्रोल दुचाकी आणि मोटारीमध्ये भरण्याची सक्ती केली जात आहे. याबाबतच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. त्यामध्ये स्पीड, पॉवर, एक्‍स्ट्रॉ माईल, टर्बोजेट आणि हायस्पीड या प्रीमियम पेट्रोलचा समावेश आहे. 

कोणत्याही मोटार उत्पादक कंपनीकडून प्रीमियम पेट्रोलच वापरावे, अशी कुठलीही लेखी शिफारस नसली तरी देखील काही पंपचालकांकडून नागरिकांना प्रीमियम पेट्रोल विकले जात असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. 

या संदर्भात नागरिक अभय कोंढरे म्हणाले, ""मी सातारा रस्ता येथील एका पेट्रोलपंपावर मोटारीमध्ये नेहमी साधे पेट्रोल भरत असतो. गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोलपंप साधे पेट्रोल संपल्याचे कारण देत प्रीमियम पेट्रोल भरण्यास भाग पाडत आहेत.'' 

याविषयी सिंहगड रस्ता येथील रहिवासी स्वाती पाटील म्हणाल्या, ""आम्ही तीन महिन्यांपूर्वी मोटार घेतली, त्या वेळी विक्रेत्यांकडून प्रीमियम पेट्रोल भरण्याचे कार्ड दिले होते. त्या कार्डची मुदत संपल्यानंतरही एका ठराविक पेट्रोलपंपावर नवीन मोटारीमध्ये प्रीमियम पेट्रोल भरण्याचा आग्रह धरला जात आहे.'' 

कंपन्यांकडून प्रतिसाद नाही 

यासंदर्भात मोटार उत्पादक ह्युंदाई, मारुती सुझुकी, टोयाटो, रेनॉ, टाटा मोटर्स, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू आदी कंपन्यांशी अधिकृत प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. 

काही पेट्रोलपंप चालकांकडून नागरिकांना प्रीमियम पेट्रोल भरण्यासाठी सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. पंपचालकांना अशी सक्ती करता येत नाही. "द ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन'चा ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध सक्तीने प्रीमियम पेट्रोल विकणाऱ्या पेट्रोलपंपचालकांना पाठिंबा नाही. 

- अली दारूवाला, राष्ट्रीय प्रवक्ता, द ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन 

सर्व मोटारींमध्ये साधे पेट्रोल आणि डिझेल भरणे योग्य असते. परंतु प्रीमियम पेट्रोलमध्ये एक्‍स्ट्रॉ ऍडिटिव्ह आणि डिटर्जंट असते. हे घटक "ऑक्‍टेन'चे प्रमाण वाढवीत असल्यामुळे वाहनाचा पिकअप आणि मायलेजमध्ये थोडाफार फरक पडतो. पण कुठलेही पेट्रोल किंवा डिझेल भरले तरी समस्या निर्माण होतेच. 
- गोरख आवळे, चारचाकी वाहनतज्ज्ञ 

रॉयल एनफिल्डकडून प्रीमियम पेट्रोल भरण्यासंदर्भात कुठलेही बंधन किंवा शिफारस केली जात नाही. साध्या पेट्रोलवर आमच्या गाडीचे इंजिन उत्तम काम करते. 
- रुद्रतेज सिंग, अध्यक्ष, रॉयल एनफिल्ड 

पुणे व पिंपरी- चिंचवड शहर आणि जिल्ह्यामध्ये कोणी पंपचालक प्रीमियम पेट्रोल भरण्यासाठी सक्ती करत असेल तर ते योग्य नाही. अशा प्रकारे कोणत्याही पंपचालकांनी सक्ती करू नये, असे आवाहन आम्ही करतो. 

- समीर लडकत, अध्यक्ष, पेट्रोल डीलर्स असोसिएशन पुणे (पीडीएपी) 

एकूण पेट्रोलपंप ः 700 
पुणे शहर व जिल्हा ः 550 
पिंपरी- चिंचवड ः 150 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.