Foreign Pilots Demand: भारतीय नेत्यांना हवे परदेशी हेलिकॉप्टर्स अन् पायलट्स! निवडणूक काळात वाढली मागणी; तासाचा दर लाखोंमध्ये

देशातील हे वर्ष निवडणुकांचं वर्ष आहे. पुढील दोन महिन्यात लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.
Helicopter, Pilot
Helicopter, Pilot
Updated on

पुणे : देशातील हे वर्ष निवडणुकांचं वर्ष आहे. पुढील दोन महिन्यात लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. यंदाची लोकसभा निवडणूक मोठी प्रतिष्ठेची आणि आव्हानांची असणार आहे. भाजप आणि काँग्रेससहित इतर विरोधी पक्षांची इंडिया आघाडी अशी ही थेटपणे लढत होणार आहे. त्यामुळं राजकीय नेत्यांची खूपच पळापळ होणार आहे.

यापार्श्वभूमीवर वेळ वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्यामुळं यंदाच्या या निवडणूक हंगामात परदेशी हेलिकॉप्टर्स अन् पायलट्सना मोठी मागणी आहे. त्यांचा तासाभराचा उड्डाणाचा दर ऐकूनही तुम्ही आवाक् व्हाल. (foreign helicopters and filots increased demand during this election period)

Helicopter, Pilot
Sharad Pawar: शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टात धाव; निवडणूक आयोगाच्या निकालाला दिलं आव्हान

भारतात अनुभवी पायलट्सची कमी

भारतातील सार्वत्रिक निवडणूक ही जगातील सर्वात मोठी निवडणूक असते. त्यासाठी नेत्यांना जलद आणि आरामदायी प्रवासासाठी हेलिकॉप्टरची गरज भासते. पण भारतात अनुभवी हेलिकॉप्टर पायलट्सची कमतरता आहे. यापार्श्वभूमीवर परदेशातील हेलिकॉप्टर्स अन् पायलट्सना मागणी वाढली आहे, टाइम्स ऑफ इंडियानं याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे. (Latest Maharashtra News)

Helicopter, Pilot
Farmers 'Delhi Chalo' March: दिल्लीचं जनजीवन विस्कळीत होतंय, शेतकऱ्यांना रोखा; सुमोटोसाठी सरन्यायाधिशांना पत्र

यापार्श्वभूमीवर हेरिटेज एव्हिएशनचे व्यवस्थापकीय संचालक रोहित माथूर सांगतात, "भारतातील हेलिकॉप्टर इंडस्ट्री ही सध्या भारतीय हवाई दलातील माजी पायलट्सवर अवलंबून आहे. तसेच काही हाताच्या बोटावर मोजता येतील अशी हेलिकॉप्टर चालक प्रशिक्षण संस्था सोडल्यास याची देखील वानवाच आहे. त्यामुळं मागणीच्या तुलनेत पायलट्सचा पुरवठा खूपच कमी आहे."

"आपल्याकडं हेलिकॉप्टर इंडस्ट्री ही खूपच मोठी इंडस्ट्री व्हायला हवी. पण यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आणि नियमनातील संकुतिचपणा हा याला मारक ठरत आहे," असं रोटरी विंग सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल एएस बुटोला यांनी म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

Helicopter, Pilot
Maharashtra Congress Meeting: अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची आज महत्वाची बैठक, पक्षात बदलाचे संकेत; वडेट्टीवारांनी दिली महत्वाची माहिती

दिवसभरात किमान २-३ तासांचं उड्डाण गरजेचं

तसंच ग्लोबल व्हेक्ट्रा हेलिकॉर्प्स या कंपनीनं सांगितलं की, "आमच्याकडं ३२ हिलिकॉप्टर्सची फ्लीट आहे. राजकीय सभांसाठी आम्ही हेलिकॉप्टर्सची सेवा पुरवतो. बऱ्याचदा आमच्याकडील हेलिकॉप्टर्स ही सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात बुक होतात. (Latest Marathi News)

या काळात राजकीय पक्षांकडून मागणी नोंदवली जाते. बरीच हेलिकॉप्टर्स ही ट्विनइंजिन असल्यानं त्याचे दर हे ४० ते ५० टक्क्यांनी जास्त आहेत. या हेलिकॉप्टर्ससाठी तासाला ३ ते लाख रुपये फी आकरली जाते" हेलिकॉप्टर्स कंपन्यांना परवडणारं भाड्यासाठी दिवसभरात किमान २ ते ३ तासांसाठी हेलिकॉप्टर्सचं उड्डाण आवश्यक असतं. किंवा ६०-१५० तासांचं उड्डाण आवश्यक असतं.

Helicopter, Pilot
Plane Door Falls : धक्कादायक! विमान हवेत असतानाच निखळला दरवाजा; 'या' आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

हेलिकॉप्टर्सची मागणी का?

हेलिकॉप्टर्सना मोठी मागणी आहे कारण त्याचा वापर बहुतकरुन 'लास्ट माइल कनेक्टिव्हिटी'साठी अर्थात स्टार्टिंग पॉईंटपासून प्रवाशांना थेट नागरिकबहुल भागात उतरता येणं शक्य होतं. तर फिक्स्ड विंग हेलिकॉप्टर्समध्ये ८ ते १२ लोकांच्या बैठकीची व्यवस्था असते त्यामुळं ही हेलिकॉप्टर्स जास्त पसंतीची आहेत. राष्ट्रीय नेत्यांना देशातील इतर कोणत्याही महत्वाच्या शहरांमध्ये पोहोचण्यासाठी ते जास्त योग्य ठरतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.