Junnar News : पाच गावांतील शंभर हेक्टर क्षेत्रातील अतिक्रमणे वनविभागाने काढली

जुन्नर वन विभागाने ओतूर परिक्षेत्रातील खोडद, नगदवाडी, वडगाव कांदळी, येडगाव तसेच हिवरे तर्फे नारायणगाव येथील १०० हेक्टर वनक्षेत्रातील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात काढली असल्याची माहिती उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी दिली.
Forest Department Removes Encroachments in Five Villages junnar
Forest Department Removes Encroachments in Five Villages junnarSakal
Updated on

जुन्नर : जुन्नर वन विभागाने ओतूर परिक्षेत्रातील खोडद, नगदवाडी, वडगाव कांदळी, येडगाव तसेच हिवरे तर्फे नारायणगाव येथील १०० हेक्टर वनक्षेत्रातील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात काढली असल्याची माहिती उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी दिली.

ओतूर परिक्षेत्रातील एकूण १४८ वनहक्क दाव्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना नैसर्गिक न्यायाची पुरेशी संथी दिल्यानंतर ह्या वनक्षेत्रामधील अतिक्रमणे आज ता.०७ रोजी पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहेत.

ही कार्यवाही मुख्य वनसंरक्षक एन.आर.प्रविण,उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांचे मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक अमित भिसे, संदेश पाटील यांचे नेतृत्वाखाली जुन्नर, ओतूर, मंचर, खेड, चाकण येथील वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे,

स्मिता राजहंस,प्रदीप रौन्धळ,महेश गारगोटे,प्रदिप चव्हाण,संतोष कंक तसेच व कर्मचारी यांनी केली. घेतला. उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर,सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार तसेच तहसीलदार रविंद्र सबनिस यांचे सहकार्याने वनविभाग,

पोलीस व महसूल विभागाच्या एकूण ४०० जणांच्या पथकाने कार्यवाही पूर्ण केली.यावेळी अतिक्रमण धारकांच्या एकूण ११६ झोपड्या, कांदा, केळी, वांगी, ज्वारी पिकाचे शेती क्षेत्र तसेच साहित्य जेसीबीच्या सहाय्याने काढणेत आले.

या कार्यवाहीसाठी ४० जेसीबी, ७ट्रॅक्टर, पोलिसांकडील वाहने तसेच २ रुग्णवाहिका व फायर ब्रिगेड वाहने वापरण्यात आली. तसेच अतिक्रमण धारकांना त्यांचे मूळ गावी जाणेसाठी सांगण्यात आले,

विस्थापितांना वनविभागाकडून मदत करण्यात आली. येथे पुन्हा अतिक्रमण करू नये यासाठी वनविभागाकडून खोल सलग समतल चर खोदणेची कार्यवाही देखील करण्यात आली असल्याचे सातपुते यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.