पुणे : कोथरुड विधानसभा मतदार संघाच्या भाजपाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी भाजप सोडून मनसे पक्षात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या सध्या माध्यमांमध्ये व्हायरल झाल्या आहेत. याबाबत ई सकाळशी बोलताना त्यांनी हे वृत्त फेटाळून लावत मी कुठल्याही पक्षात चालली नाहीये. मी भाजपमध्येच आहे. पक्षबदलाच्या वावड्या जाणीवपुर्वक उठविल्या जात आहेत. त्यात काही तथ्य नाही, असे सांगितले.
ई सकाळशी बोलताना माजी आमदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, ''पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी मी इच्छूक नाही. प्रदेशाध्य़क्ष चंतद्रकांत दादांनी अगोदरच जे इच्छूक आहेत व त्यांनी ज्यांना शब्द दिला आहे त्यांची नावे मला सांगितली होती. त्यामुळे मी इच्छूक असण्याचा संबंध नाही. आणि मला शब्द देण्याची ग्रॅव्हिटी कळते त्यामुळे मी इच्छूक असण्याचा संबंध नाही. आणि मनसे प्रवेशाच्या बातम्या या वावड्या आहेत. त्या जाणीवपूर्वक माध्यमांमध्ये उठविल्या जात आहेत. मी कुठल्याही पक्षात जात नाहिये. मी भाजपमध्येच आहे. तसेच मी पक्षनोंदणीच्या कार्यक्रमात सहभागी होत पक्षवाढीसाठी प्रयत्न करत आहे.''
तसेच पुढे त्या म्हणाल्या, माझ्या पक्ष सोडण्याच्या चर्चा कोण घडवून आणत आहे याचा शोध घ्यायला हवा. हे सर्व जाणीवपुर्वक केले जात आहे. २०१९ विधानसभा निवडणुकीत पक्षाने मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कापत त्यांच्या जागेवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली होती. यानंतर पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपाकडून उमेदवारी मिळणं अशक्य असल्यामुळे मेधा कुलकर्णी मनसेकडून नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार अशी माहिती समोर येत होती. परंतू सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये पसरलेल्या बातम्यांवर मेधा कुलकर्णी यांनी 'ई सकाळ'शी बोलताना वरिल प्रतिक्रीया दिली.
(संपादन : सागर डी. शेलार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.