NCP Former Corporator Bandu Gaikwad Son Accident Viral Video
NCP Former Corporator Bandu Gaikwad Son Accident Viral Video Esakal

Viral Video: पुण्यात पुन्हा ड्रंक अँड ड्राईव्ह! माजी नगरसेवकाच्या मुलाच्या कारची टेम्पोला धडक; भयंकर अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

Bandu Gaikwad Son: पुण्यात आणखी एक भयंकर अपघात झाल्याची घटना समोर आली असून, त्याचा एक भयंकर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Published on

गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात अपघातांच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशात आता शहरात आणखी एक भयंकर अपघात झाल्याची घटना समोर आली असून, त्याचा एक भयंकर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेल्या एका एसयूव्ही कारची टेम्पोला जोरदार धडक बसल्याने ड्रायव्हर आणि क्लिनर गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान अपघात घडला त्यावेळी ही कार माजी नगरसेवक बंडू गायकवाड यांचा मुलगा चालवत होता.

बंडू गायकवाड यांचा मुलगा सौरभ हा अपघाताच्या वेळी दारूच्या नशेत गाडी चालवत होता. हा अपघात मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास घडला होता.

NCP Former Corporator Bandu Gaikwad Son Accident Viral Video
Rain : पुणे जिल्ह्यात आज ‘ऑरेंज अलर्ट’;घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बरसण्याचा इशारा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक बंडू गायकवाड यांचा मुलगा सौरभ हा घटनेच्या वेळी दारूच्या नशेत होता.

तो दारूच्या नशेत गाडी चालवत होता, या घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कोंबडी घेऊन जाणारा एक टेम्पो रस्त्यावरून जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एसयूव्हीने त्याला धडक दिली.

दोन्ही वाहनांच्या धडकेमुळे कोंबड्या टेम्पोतून रस्त्यावर पडल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. याप्रकरणी आरोपी सौरभ गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

NCP Former Corporator Bandu Gaikwad Son Accident Viral Video
Murlidhar Mohol : देशात एक हजार नवी विमाने येणार;केंद्रीय राज्‍यमंत्री मोहोळ यांची माहिती,‘पॅनासोनिक एव्हिऑनिक्‍स’ केंद्राचे उद्‌घाटन

दरम्यान पुण्यात दोन महिन्यांपूर्वी एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भयंकर अपघात केला होता. ज्यामध्ये दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर बांधकाम व्यावसायिकाने पैशाचा वापर करत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता. पण या विरोधात नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर प्रकरण गाजले आणि तिथून मग आरोपींवर कारवाईला जोर आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.