Salil Ankola Mother Found Dead : माजी क्रिकेटपटू सलिल अंकोला यांच्या आईचा खून? घटनेमुळे पुणे शहरात एकच खळबळ

Salil Ankola Mother Found Dead in Pune Home : त्यांचा खून झाला की आत्महत्या ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
Former Indian cricketer Salil Ankola mother Mala Ankola Found Dead in Pune Home
Former Indian cricketer Salil Ankola mother Mala Ankola Found Dead in Pune Home
Updated on

पुणे - माजी भारतीय क्रिकेटपटू सलिल अंकोला यांच्या आई डेक्कन परिसरात प्रभात रस्त्यावरील घरात मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांच्या गळ्यावर जखम झाल्याचे आढळून आले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, घराचा दरवाजा बंद करून त्यांनी स्वतःचा गळा चिरून घेतल्याची शक्यता आहे. परंतु त्यांचा खून झाला की आत्महत्या ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही.

माला अशोक अंकोला (वय ७७, रा. प्रभात रस्ता, डेक्कन) असे त्यांचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या मातिहीनुसार, माला अंकोला प्रभात रस्त्यावरील एका सोसायटीमध्ये त्यांच्या मुलीसमवेत राहत होत्या. त्यांना सिझोफ्रेनिया नावाचा मानसिक आजार होता. त्यांच्या गळ्यावर समोरच्या बाजूला जखम आढळून आली आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यानंतर घरातील सदस्य बाहेर गेले होते. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घरात काम करणारी बाई आली. बेल वाजवूनही दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी मुलीला फोन केला. मुलीने वडिलांना माहिती दिली. त्यांनी दरवाजा उघडला असता माला अंकोला रक्ताच्या थारोळात पडल्या होत्या. नातेवाइकांनी त्यांना शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पूना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण कुमार पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. घराचा दरवाजा बंद करून त्यांनी स्वतःचा गळा चिरून घेतल्याची शक्यता आहे. परंतु त्यांचा खून झाला की आत्महत्या ही बाब समजू शकली नाही. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.