पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (वय ४०) यांचा खून कौटुंबिक वादातून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी वनराज आंदेकर यांची बहीण, मेव्हणा आणि भाच्यासह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी पाच जणांना अटक केली आहे. या घटनेमुळे गुन्हेगारी आणि राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.