Gram Panchayat Election : खटकाळे ग्रामपंचायत मध्ये माजी पंचायत समिती सदस्याला पराभवाचा धक्का

अश्विनी राजाराम केदारी, अश्विनी भागू बोऱ्हाडे हे उमेदवार बिनविरोध निवडून आले तर उर्वरित पाच जागांसाठी दहा उमेदवार रिंगणात
former panchayat samiti member is defeated in Khatkale Gram Panchayat election pune
former panchayat samiti member is defeated in Khatkale Gram Panchayat election puneSakal
Updated on

आपटाळे : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील खटकाळे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत माजी पंचायत समिती सदस्य काळू चिंधा गागरे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या निवडणुकीत बाळू अप्पा केदारी यांनी बाजी मारली.

बाळू केदारी यांना 232 मते मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवार काळू चिंधा गागरे यांना 155 मते, देवका नारायण मोरे यांना 101 मते, विक्रम रामभाऊ केदारी यांना 154 मते, तर नवनाथ गोपाळा मोरे यांना 118 मते मिळाली. माजी पंचायत समिती सदस्य काळू गागरे यांना पराभवाचा झटका बसल्याने आदिवासी भागातील राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.

खैरे खटकाळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सात सदस्यांपैकी अश्विनी राजाराम केदारी, अश्विनी भागू बोऱ्हाडे हे उमेदवार बिनविरोध निवडून आले तर उर्वरित पाच जागांसाठी दहा उमेदवार रिंगणात होते.

या लढतीत तान्हाजी चिमाजी घोईरत, तुकाराम पांडुरंग मोडक, सुरेखा भरत मोडक, दिलीप रामचंद्र मोरे, बेबी शशिकांत गागरे हे उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी मतदान केंद्रा बाहेर जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा केला. विजयी उमेदवारांचे गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.