Pune : आकाशात झेपावणाऱ्या विमानांचा एरोमॉडेलिंग शो रंगला....!!

रविवार सुटीचा दिवस असला तरी शालेय विद्यार्थ्यांची पावले वळली ती फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानाकडे !!
 foundation day of Indian Air Force aero modeling show of radio controlled aircraft was organized in Fergusson College Deccan Education Society
foundation day of Indian Air Force aero modeling show of radio controlled aircraft was organized in Fergusson College Deccan Education SocietySakal
Updated on

पुणे : रविवार सुटीचा दिवस असला तरी शालेय विद्यार्थ्यांची पावले वळली ती फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानाकडे !! एकामागून एक असे हजारो विद्यार्थी जमले. त्यानंतर रेडिओ कंट्रोलच्या साहाय्याने अवघ्या काही क्षणात एकामागून एक उडणारी विमाने आकाशात झेपावली. विविध प्रकारची विमाने, विशेष म्हणजे लढाऊ विमानाचे चित्तथरारक प्रात्यक्षिकांना पाहत विद्यार्थ्यांसह पालकांनीही जल्लोष करत आनंद व्यक्त केला.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने भारतीय वायुदलाच्या स्थापना दिनानिमित्त रेडिओ कंट्रोलने उडणाऱ्या विमानांचा एरोमॉडेलिंग शो फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानात आयोजित करण्यात आला. यात उडणारा गरुड, उडता मासा, उडती तबकडी, दोन पंखी बायप्लून, मिग २१, जॅग्वार, मिराज २०००, सुखोई, तेजस अशा विमानांच्या एरोमॉडेलिंगचे सादरीकरण झाले.

विमानाचे मॉडेल तयार करण्याचा छंद असणारे सदानंद काळे आणि  त्यांचा मुलगा अर्थव काळे यांनी हा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमात एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), शिक्षण संचालक (योजना) डॉ. महेश पालकर, सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.