वालचंदनगर - रणगाव (ता. इंदापूर) येथील साडेचार वर्षाच्या रुद्रा महादेव जाधव या चिमुरड्या मुलाने तुडुंब भरलेल्या विहिरीमध्ये उडी मारल्यामुळे पाण्यामध्ये बुडुन मृत्यू झाल्याची घटना घडली.
रणगाव गावतील महादेव जाधव हे त्यांच्या रुद्रा (वय-४.५ वर्षे) व अक्षदा (वय-६ वर्षे) या मुलांना निमसाखर गावच्या हद्दीमध्ये असलेल्या विहिरीमध्ये गेल्या पाच -सहा दिवसापासुन पोहायला शिकवत होते. घराजवळच पाण्याने भरलेली विहीर आहे.