पुणे - शहर पोलिस दलातील चार पोलिस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचा आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढला आहे.
गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्तपदी निखिल पिंगळे यांची नेमणूक करण्यात आली आहे. ते यापूर्वी गोंदिया आणि लातूर येथे जिल्हा पोलिस अधीक्षकपदी कार्यरत होते. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांची वाहतूक शाखेच्या उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.