माळेगाव ः माळेगाव बुद्रूक (ता. बारामती) येथील राष्ट्रवादीचे कार्य़कर्ते रविराज तावरे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील अल्पवयीन मुलासह चार आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली आहे. एवढ्यावर पोलिस प्रशासन थांबणार नसून यापुढे आॅपरेशन माळेगाव राबविण्यास सज्ज झाले आहे. त्यामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांबरोबर सावकारी करणाऱ्या लोकांची यादी करणे, गावठी कट्टे व इतर शस्त्र शोध मोहिम राबविणे, महिला सुरक्षितता आणि लहान मुलांचा वापर गुन्ह्यात होऊ नये या संबंधी ठोस कारवाई करणारा अॅक्शन प्लॅन तयार आहे.
विशेषतः या मोहिमेत गुंड प्रवृत्ती ठेचून काढण्याबरोबर माळेगावच्या पोलिसांचीही कार्यक्षमता तपासली जाणार आहे. अकार्य़क्षम पोलिसांचीही साफसफाई होणार आहे, अशी ठोस भूमिका अप्पर पोलिस अधिक्षक मिलींद मोहिते यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहिर केली. माळेगाव येथे राजकिय वैमनस्यातून राष्ट्रवादीचे कार्य़कर्ते रविराज तावरे यांच्यावर (ता. ३१ मे रोजी) गोळीबार झाला होता. त्या प्रकरणातील माळेगाव येथील सराईत गुन्हेगार प्रशांत पोपटराव मोरे, टाॅम उर्फ विनोद पोपटराव मोरे, राहुल उर्फ रिबेल कृष्णांत यादव यांच्यासह एका अल्पवयीन मुलावर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई कऱण्यात आली. विशेषतः या आरोपींना या अगोदरच अटक केली असून उपविभागिय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर तपास करत आहेत. त्या पार्श्वभूमिवर पत्रकारांशी बोलताना अप्पर पोलिस अधिक्षक मिलींद मोहिते यांनी वरिल माहिती स्पष्ट केली.
मोहिते म्हणाले, ''माळेगाव येथे नव्याने नगरपंचायत अस्तित्वात आल्याने पहिला नगराध्यक्ष अथवा नगरसेवक कोण ? यामध्ये मोठी इर्शा निर्माण झाली आहे. साहजिकच त्यामुळे गावात राजकिय वर्चस्व प्रस्तापित करण्यासाठी अनेकजण गुन्हेगारांना पाठीशी घालताना अढळून आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रविराज तावरे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाकडे पाहिले जाते. या प्रतिकूल स्थितीमुळे माळेगाव सध्या खूपच संवेदनशील बनत चालले आहे. त्या पार्श्वभूमिवर संबंधित गावात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व संघटीत गुन्हेगारी संपविण्याच्या दृष्टीने पोलिसांनी ठोस अॅक्शन घेतली आहे.'' माळेगाव पोलिसांच्या कार्य़क्षमतेबाबत विचारणा केली असता मोहिते म्हणाले, ''जनतेच्या तक्रारींची तातडीने दखल घेणे व योग्य तक्ररींवर तातडीने कार्य़वाही करणे हे काम बारामती पोलिसांनी मनापासून करावे, अन्यथा त्यांनाही यापुढे खातेनिहाय चौकशीसह योग्य त्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.''
पोलिस अधिक्षकांची निर्णायक भूमिका... कार्य़कर्ते तावरे यांच्यावर गोळीबार झाला होता त्यावेळी खुद्द पोलिस अधिक्षक डाॅ अभिनव देखमुख यांनी माळेगाव येथील घटनास्थळी भेट दिली होती. त्यांनी संबंधित आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता. तसेच गावात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व संघटीत गुन्हेगारी संपविण्याच्या दृष्टीने पोलिस ठोस अॅक्शन घेतील असे सांगितले होते.
गावठी कट्टा नगरमधून आणला... तावरे यांच्यावर गोळिबार करण्यासाठी वापरलेला गावठी कट्टा आरोपींनी नगर जिल्ह्यातून आणला होता. अर्थात या प्रकरणाचा मास्टर माईड आरोपी प्रशांत मोरे हाच असून त्यानेच रविराज तावरे यांना संपविण्यासाठी कटकारस्थान रचले होते, हे पोलिस तपासात सिद्ध झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.