Katraj News : पद्मावतीत विणकर सभागृहाजवळ चारचाकी वाहनाला आग; अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण

पद्मावती येथे आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एका चारचाकी वाहनाला आग लागल्याची घटना घडली.
Katraj Fire Brigade Station
Katraj Fire Brigade Stationesakal
Updated on
Summary

सदर वाहन हे फोर्ड कंपनीचे असून डिझेल वापरातील आहे. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

कात्रज : पद्मावती येथे रविवारी (ता. १४) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एका चारचाकी वाहनाला आग लागल्याची घटना घडली. पद्मावती येथे विणकर सभागृहाजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाने पेट घेतल्याची वर्दी मिळताच कात्रज अग्निशमन केंद्र (Katraj Fire Brigade Station) येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनाच्या पुढील भागाकडे आगीच्या ज्वाळा दिसत होत्या, तर मागील बाजूस इंधनाची ही गळती होत असल्याचे पाहून त्यांनी तातडीने आगीवर पाण्याचा मारा सुरू करत फोमचा वापर करुन सुमारे दहा मिनिटात पूर्ण आग आटोक्यात आणत धोका दूर केला.

Katraj Fire Brigade Station
प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची 'ती' ऑडी मोटार पोलिसांच्या ताब्यात; लाल दिव्याच्या या गाडीवर काय लिहिलं होतं?

सदर वाहन हे फोर्ड कंपनीचे असून डिझेल वापरातील आहे. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. या कामगिरीत अग्निशमन अधिकारी प्रदिप खेडेकर, वाहनचालक गणेश भंडारे, फायरमन पंकज इंगवले, निलेश राजीवडे, अभिषेक खाटपे, योगेश कुंभार, विनायक घागरे यांनी सहभाग घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com