पुणे - गणेश पेठेत दहीहंडीच्या दिवशी गुरुवारी (ता. ७) लोखंडी सांगाडा कोसळून चार ज्येष्ठ महिला जखमी झाल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी मंडळाच्या चार कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत गणेश लालचंद चंगेडिया (वय ३८, रा. नाना पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. मंडळाचे कार्यकर्ते राहुल चव्हाण, अजय बबन साळुंखे, गोपी चंद्रकांत घोरपडे (रा. गणेश पेठ) आणि चेतन समाधान आहिरे (रा. खराडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश पेठेतील पांगुळ आळीत श्रीकृष्ण तरुण मंडळाकडून दहीहंडी उत्सवासाठी ध्वनी आणि प्रकाश योजनेसाठी लोखंडी सांगाडा उभारण्याचे काम सुरू होते.
त्यावेळी तेथून जाणाऱ्या महिलांच्या अंगावर लोखंडी सांगाडा कोसळून त्या जखमी झाल्या. मंदा लालचंद चंगेडिया (वय ६७), निर्मलादेवी नवीन पुनमिया (वय ६९), केवलचंद मांगीलाल सोळंकी (वय ६६) आणि ताराबाई केवलचंद सोळंकी (वय ६४) अशी जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.