Ambegaon News: खेळाचं मैदान गाजवणाऱ्या शेतकरी कुटुंबातील १४ नवदुर्गा सरकारी सेवांमध्ये रुजू

Ambegaon News: खो-खो खेळाचे मैदान गाजवणाऱ्या शेतकरी कुटुंबातील १४ नवदुर्गा आता विविध क्षेत्रातील सरकारी सेवेत रुजू झाल्या असून यामध्ये १० जणीनी खाकी वर्दी पटकावली आहे.
fourteen young athletes from ranjani are breaking barriers in government service
14 navdurgasakal
Updated on

रांजणी: खो-खो खेळाचे मैदान गाजवणाऱ्या शेतकरी कुटुंबातील १४ नवदुर्गा आता विविध क्षेत्रातील सरकारी सेवेत रुजू झाल्या असून यामध्ये १० जणीनी खाकी वर्दी पटकावली आहे.३ पोलिस उपनिरीक्षक,१ राज्य विक्रीकर निरीक्षक,१ क्रीडा अधिकारी,१ आरोग्य अधिकारी,७ पोलिस कॉन्स्टेबल,१ ग्राम महसूल अधिकारी म्हणून रांजणी (ता.आंबेगाव) येथील क्रीडा मंडळातील तब्बल १४ खो खो खेळाडूचा समावेश आहे.

आंबेगाव तालुक्यातील रांजणी येथील खेडेगावातील नरसिंह क्रीडा मंडळाच्या माध्यमातून अनेक खो खो खेळाडू घडले,अस्सल मातीच्या खेळातून मिळालेली जिद्द,चिकाटी आणि एकाग्रता वाया गेली नाही तर खो खो खेळाच्या माध्यमातून गावाचे,राज्याचे नाव देशात गाजवले,आता हेच नाव सरकारी अधिकाऱ्यांचे गाव म्हणून चर्चेत आले आहे.

नरसिंह क्रीडा मंडळाच्या १४ नवदुर्गा खो खो मैदानाच्या जिद्दितून सरकारी सेवेत दाखल झाल्या आहेत,मैदानावरील शारिरीक क्षमता पुढे सरकारी नोकरीत रुजू होण्यासाठी कामाला आली,खो खो खेळाडूंची खेळाच्या कोट्यातून विविध क्षेत्रात निवड झाली आहे,

fourteen young athletes from ranjani are breaking barriers in government service
Sports Bulletin 6th October 2024: भारतीय महिला संघाचा पाकिस्तानवर विजय ते रोहित शर्माला पत्नीसमोर तरुणीनं केलेलं प्रपोज

त्यामध्ये प्रणाली बेनके ही पोलिस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाली आहे,तिने खोखो मैदान गाजवताना १७ राष्ट्रीय खो खो स्पर्धा खेळून राज्य संघाला १४ सुवर्णपदक पटकावून देण्यात मोलाची कामगिरी बजावली तर तीन वेळा महाराष्ट्र राज्य संघाचे कर्णधारपद मिळवून संघाचे नेतृत्व केले आहे.

काजल भोर हीची क्रीडा अधिकारी म्हणून थेट नियुक्ती सरकारने केली आहे,तिने मैदानावर १८ राष्ट्रीय खो खो स्पर्धा खेळून राज्याला १८ वेळा सुवर्ण पदक पटकावून दिले आहे तसेच दक्षिण आशियाई खो खो स्पर्धेत भारतीय महिला संघाकडून खेळताना सुवर्ण पदक तसेच नॅशनल गेम्स गोवा यामध्ये महाराष्ट्र संघाकडून खेळताना सुवर्ण पदक मिळवले आहे.

भाग्यश्री जाधव व पल्लवी वाघ यांची देखील पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली आहे त्यामध्ये भाग्यश्री हिने दोन राष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्ण आणि नऊ राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण पदके पटकावली आहेत तर पल्लवी वाघ हिने देखील खो खो स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.