विद्यार्थी आणि पालकांनो, अॅडमिशनवेळी जास्त पैसे घेतलेत? मग अशी करा तक्रार

Students_Admission
Students_Admission
Updated on

पुणे : व्यवसायिक अभ्यासक्रमाला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून विद्यार्थी आणि पालक आशावादी असतात. प्रवेश फेऱ्या सुरू झाल्यानंतर एखाद्या संस्थेत प्रयत्न करून प्रवेशाची खात्री मिळेलही, पण ते तेवढे शुल्क भरून निर्धास्थ होऊ नका. सावध राहा, शुल्क नियंत्रण प्राधिकरणाने (फीस रेग्यूलेटिंग ऍथॉरिटी-एफआरए) निश्‍चित केलेले शुक्‍ल किती आहे, ते तपासा त्यानंतरच पैसे भरा. जर जास्त पैसे घेतले जात असतील, तर त्याची तक्रार नक्की करा.

सीईटी सेलने अभियांत्रिकी, आर्किटेक्‍चर, फार्मसी, एमबीएसह इतर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. यंदा प्रवेशाच्या दोनच फेऱ्या होणार असल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी वाट पाहण्यासाठी कमी वेळ आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए या अभ्यासक्रमाचे शिक्षण देणारी अनेक महाविद्यालये आहेत. चांगला कॅम्पस, प्लेसमेंटची खात्री, गुणवत्तापूर्ण शिक्षण अशा प्रकारे प्रचार केला जातो. या संस्थांचे शुल्क लाखो रुपयांमध्ये असले तरी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासह परप्रांतीय विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करत असतात. पुणे शहर आणि परिसरातील महाविद्यालयांध्ये प्रवेशासाठी खूप स्पर्धा आहे असे सांगून वाढीव डोनेशनसह प्रवेश मिळवून देण्यासाठी एजंट देखील सक्रिय झालेले असतात.

शैक्षणिक संस्थांचे शुल्क जास्त असले तरी त्यामध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ओळखपत्रासह ग्रंथालय, लॅब, क्रीडा, विविध उपक्रम, प्राध्यापकांचा पगार यासह सर्व खर्चाच्या बाबींचा विचार करून त्यास 'एफआरए'ने देखील मंजुरी दिलेली असते. त्यामुळे या मंजूर शुल्काशिवाय जादा शुल्क घेण्याचा अधिकार महाविद्यालयांना नसतो. महाविद्यालयांनी डोनेशन घेतले तरी त्याची अधिकृत पावती देऊन ती महाविद्यालयाच्या उत्पन्नात दाखवावी लागते. त्यामुळे या वाढीव उत्पन्नाचा पुढच्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्यांना मिळतो. मात्र, अनेकदा संस्थांकडून हे डोनेशन अधिकृतपणे न घेता इतर मार्गांनी घेतल्याने विद्यार्थ्यांना याचा दिलासा मिळत नाही.

"नवीन वर्षाच्या प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. पण प्रवेश घेताना महाविद्यालयांची "एफआरए'ने मंजूर केलेली शुल्क किती आहे याची तपासणी पालक, विद्यार्थ्यांनी केली तर फसवणूक टळू शकेल. जर महाविद्यालयांनी कोणत्याही कारणाने जास्त शुल्क घेतले तर त्यांच्यावर कारवाई होऊ केली जाते आणि तक्रारदास पैसे मिळवून दिले जातात. तसेच महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून घेतलेले डोनेशन उत्पन्नात दाखवणे आवश्‍यक आहे.''
- डॉ. आर. एस. माळी, सदस्य, 'एफआरए'

इथे तपासा शुल्क
व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थांचे शुल्क किती आहे हे 'एफआरए'च्या www.sssamiti.org या संकेतस्थळावर तसेच सीईटी सेलच्या संकेतस्थळावर अर्ज भरतानाही संबंधित महाविद्यालयाची शुल्क किती आहे हे दिसते. जर जास्त शुल्क घेतले जात असले तरी 'एफआरए'चे सदस्यांकडे किंवा कार्यालयाच्या इमेलवर, फोनवर तक्रार करता येते, असे माळी यांनी सांगितले.

पोलिस ठाण्यात चकरा मारण्याची वेळ
अभियांत्रिकी, वैद्यकीय, एमबीए आदी अभ्यासक्रमांसाठी प्रतिष्ठित महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या हाण्याचे एजंट पालकांकडून लाखो रुपये घेता, पण संबंधित संस्थेत प्रवेशही मिळवून देत नाहीत आणि पैसेही परत करत नाहीत. यात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी त्यानंतर आरोपी पकडला का याचा पाठपुरावा करण्यासाठी पोलिस ठाण्याला चकरा मारण्याची नामुष्की येते.

पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये :
अभियांत्रिकी

पुणे 77
नगर -12
नाशिक - 20

आर्किटेक्‍चर
पुणे - 22
नगर -1
नाशिक -3

फार्मसी
पुणे - 33
नगर - 9
नाशिक - 19

एमबीए
पुणे - 155
नगर - 23
नाशिक - 30

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.