बनावट स्क्रीनशॉटचा वापर करीत ज्येष्ठाची २६ लाखांची फसवणूक

अमेरिकेतअसलेल्या भावाच्या नावाने व्हॉटसअपवर चॅटिंग करीत फसवणूक
Fraud
Fraud sakal
Updated on

पुणे : कामानिमित्त अमेरिकेत स्थायिक असलेल्या भावाच्या नावाने व्हॉटसअपवर चॅटिंग करीत बँक खात्यावर अमेरिकन डॉलर पाठविल्याचे बनावट स्क्रीनशॉट पाठवून एका ज्येष्ठ नागरिकांची २६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी प्रशांत यशवंत देशमुख (वय ६८) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात अज्ञात मोबाईलधारक विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रशांत देशमुख यांचे बंधू भाऊ प्रकाश देशमुख हे अमेरिकेत राहतात. प्रकाश यांचे फेसबुकवरील फोटोंचा वापर करीत आरोपीने ते त्यांच्या व्हॉटसअप प्रोफाईलला ठेवले व त्या नंबरवरून फिर्यादी प्रशांत देशमुख यांच्यासोबत चॅटिंग केले.

आरोपी करीत असलेले चॅटिंग हे आपला भाऊच करीत असल्याचे आरोपींनी फिर्यादी यांना भासवले. तसेच प्रशांत देशमुख यांच्या बँक खात्यावर अमेरिकन डॉलर पाठविल्याचे खोटे स्क्रीनशॉट पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ते पैसे वेगवेगळ्या बँक खात्यांवर पाठविण्यास सांगून तक्रारदार यांची २६ लाख रुपयांची फसवणूक केली. या गुन्ह्याचा बाबत सहकारनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वाती देसाई करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.